• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई: ३३ चोरीचे मोबाईल हस्तगत, लाखोंचा मुद्देमाल जप्त!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 23, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई: ३३ चोरीचे मोबाईल हस्तगत, लाखोंचा मुद्देमाल जप्त!

जळगाव, (प्रतिनिधी) : मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या पोलीस दलाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, एमआयडीसी पोलिसांनी तब्बल ३३ चोरीचे मोबाईल हस्तगत करत मोठे यश मिळवले आहे. जप्त केलेल्या मोबाईलची किंमत अंदाजे ४ लाख ९ हजार रुपये आहे.

शनिवार, २१ जून २०२५ रोजी पेट्रोलिंग करत असताना, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते यांच्या पथकाने संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका आरोपीला आणि दोन बालकांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे चार मोबाईल सापडले. चौकशी दरम्यान, आरोपी तरुण नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदूर, मध्य प्रदेश) याने स्वामी नारायण मंदिराशेजारी असलेल्या एका शेतात, जमिनीखाली एका पिशवीत पुरून ठेवलेले आणखी मोबाईल असल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता, झाडाजवळ खड्डा खोदून ठेवलेले एकूण ३३ मोबाईल मिळून आले. हे मोबाईल शनिवार बाजार तसेच जिल्ह्यातील विविध बाजारांमधून चोरी केल्याचे आरोपीने कबूल केले.

एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपी तरुण नोरसिंह गुजरिया याला अटक करण्यात आली आहे. तो सध्या पोलीस कोठडीत असून, पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव करत आहेत. या जप्त केलेल्या ३३ मोबाईलपैकी १ मोबाईल रावेर पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार महेश मोगरे यांनी केलेल्या शोधानंतर, जप्त केलेल्या मोबाईल्समधून रावेर पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेले एकूण ८ मोबाईल त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांचे मोबाईल गहाळ झाले असतील किंवा चोरीला गेले असतील, त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा त्यांचे IMEI नंबर तपासून माहिती द्यावी. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.


 

Tags: Crime
Next Post
जळगावात पोलिसाशी हुज्जत; कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावात पोलिसाशी हुज्जत; कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य
क्रिडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 30, 2026
डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव
जळगाव जिल्हा

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

June 30, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
जळगाव जिल्हा

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group