• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शाखांनी अधिक जोमाने कार्य करावे – सुरेश बोरसे

महाराष्ट्र अंनिसची जिल्हा बैठक जामनेर येथे उत्साहात

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 22, 2025
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शाखांनी अधिक जोमाने कार्य करावे – सुरेश बोरसे

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ जगभरात पोहोचली आहे. समितीच्या कामांमध्ये अधिक ऊर्जा आणि बळ निर्माण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी शाखांवरती सातत्याने सक्रिय राहणे आवश्यक आहे. समितीच्या आयोजित होणाऱ्या शिबिरांना आणि शाखा भेटींना कार्यकर्त्यांची उपस्थिती महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक जामनेर येथे छत्रपती शिवाजीनगर येथे पार पडली बैठकीला निरीक्षक म्हणून समितीचे राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे उपस्थित होते. उद्घाटनाला अध्यक्षस्थानी डॉ. नंदलाल पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाचे सहकार्यवाह विश्वजीत चौधरी, जिल्ह्याचे दोन उपाध्यक्ष नाना लामखेडे आणि राजेंद्र बावस्कर जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे उपस्थित होते. सुरुवातीला चळवळीचे गीत सादर होऊन बैठकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे यांनी प्रस्तावना केली.

जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बावस्कर, नाना लामखेडे यांच्यासह डॉ. नंदलाल पाटील यांनी त्यांच्या मनोगतमधून, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अधिक जोमाने वाढण्यासाठी शाखांनी कार्यरत राहिले पाहिजे असे सांगितले. शहादा येथे झालेल्या विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीचा वृत्तांत विश्वजीत चौधरी यांनी मांडला. जिल्ह्यातील ५ कार्यकर्त्यांना लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार तर २ शाखांना देखील सन्मानित करण्यात आल्याबद्दल तसेच जिल्ह्यातील ३ कार्यकर्त्यांची राज्य कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल कौतुक व अभिनंदन करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील विविध शाखांनी त्यांच्या कामांचा आढावा घेत अहवाल सादर केला. पुढील काळामध्ये मानसिक आरोग्य दिन सप्ताहाचे उपक्रम, विवेक वाहिनीचे कार्यक्रम तसेच जिल्ह्यातील शाखा भेटी आणि नवीन शाखा निर्मितीबाबत नियोजन करण्यात आले.

सूत्रसंचालन जामनेर शाखेचे कार्याध्यक्ष बी. आर. पाटील यांनी केले. आभार जिल्हा महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह शोभा बोऱ्हाडे यांनी मानले. बैठकीला जिल्हाभरातील विविध शाखेतील कार्याध्यक्ष, प्रधान सचिव आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीसाठी ॲड. राजू मोगरे, रमेश गायकवाड, जे. डी. पाटील, जाबिर तडवी, सुशीला चौधरी, एन.एस.पाटील, रामदास सोनवणे, भीमराव दाभाडे, तीर्थराज सुरवाडे, बापूसाहेब सुरवाडे आदींनी परिश्रम घेतले.

Next Post
परिवर्तनतर्फे उत्कृष्ट संसद रत्न पुरस्काराबद्दल खा. स्मिता वाघ यांचा सत्कार

परिवर्तनतर्फे उत्कृष्ट संसद रत्न पुरस्काराबद्दल खा. स्मिता वाघ यांचा सत्कार

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add