• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उधना-पंढरपूर विशेष रेल्वेला मंजुरी : वारकऱ्यांसाठी खा. स्मिता वाघ यांचा यशस्वी पाठपुरावा!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 21, 2025
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
उधना-पंढरपूर विशेष रेल्वेला मंजुरी : वारकऱ्यांसाठी खा. स्मिता वाघ यांचा यशस्वी पाठपुरावा!

जळगाव, (प्रतिनिधी) : लाखो वारकऱ्यांच्या पंढरपूर वारीतील प्रवासाला आता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित स्वरूप मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ‘उधना-पंढरपूर स्पेशल ट्रेन’ला अधिकृत मंजुरी दिली असून, खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळे खान्देश आणि दक्षिण गुजरातमधील हजारो वारकऱ्यांचा पंढरपूरपर्यंतचा प्रवास सुकर होणार आहे.

पंढरपूरची वारी ही श्रद्धेची एक चालती परंपरा आहे, जिथे लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. या पवित्र यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी, सुरक्षित प्रवासासाठी आणि वेळेची बचत होण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांनी आता मूर्त रूप घेतले आहे.

विशेष गाडीची माहिती:
गाडी क्र. 09079/09080: ४ जुलै २०२५ रोजी धावणार.
गाडी क्र. 09081/09082: ५ जुलै २०२५ रोजी धावणार.
पंढरपूरहून परतीचा प्रवास: ५ व ६ जुलै २०२५ रोजी.
मार्ग: उधना – नंदुरबार – अमळनेर – धरणगाव – जळगाव – मनमाड – पंढरपूर.

खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्यासोबतच पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून ही मागणी प्रभावीपणे मांडली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना केंद्र सरकारने त्वरित मान्यता दिली. ही विशेष रेल्वे केवळ प्रवासाचे साधन नसून, भाविकांच्या मनातील विठ्ठल भेटीचा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. विशेषतः वयोवृद्ध, महिला, लहान मुले आणि युवकांसाठी हा प्रवास आता अधिक सुरक्षित, सुलभ आणि सन्माननीय ठरेल.

या यशाबद्दल बोलताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, “वारी म्हणजे चालणं नव्हे, ती श्रद्धेची, भक्तीची आणि संस्कृतीची ओळख आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी जीव ओतून मार्गस्थ होतात. त्यांच्या सेवेसाठी ‘उधना-पंढरपूर’ स्पेशल ट्रेन मिळवणं हे माझं कर्तव्यच होतं. ही ट्रेन म्हणजे भाविकांसाठी विठुरायाचं एक वरदानच ठरेल.” या मंजुरीमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Next Post
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शाखांनी अधिक जोमाने कार्य करावे – सुरेश बोरसे

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शाखांनी अधिक जोमाने कार्य करावे - सुरेश बोरसे

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group