• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वादळी वाऱ्याने झोपडीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, ४ जखमी

जामनेर तालुक्यातील धक्कादायक घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
वादळी वाऱ्याने झोपडीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू, ४ जखमी

जामनेर, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील पळासखेडा (मीराचे) शिवारात बुधवारी रात्री वादळी वाऱ्यामुळे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चिंचेचे मोठे झाड झोपडीवर कोसळल्याने रियानीबाई शांतीलाल बारेला (वय-३५) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे पती, दोन मुले आणि भावाचा मुलगा असे चार जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले बारेला कुटुंब गेल्या १० वर्षांपासून पळासखेडा मीराचे येथील प्रकाश बाबुराव विचारे यांच्या शेतात चिंचेच्या झाडाखाली झोपडी करून राहत होते आणि शेतीचे काम करत होते. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या झोपडीजवळ असलेले चिंचेचे मोठे झाड झोपडीवर कोसळले.

यावेळी झोपडीत आश्रय घेतलेल्या रियानीबाई बारेला, त्यांचे पती शांतीलाल बारेला (वय-४०), मुलगा संजय शांतीलाल बारेला (वय-१५), मुलगा संदीप शांतीलाल बारेला (वय-२०) आणि भावाचा मुलगा दयाराम धरमसिंग बारेला (वय-२०) हे सर्वजण झाडाखाली दबले गेले. या दुर्घटनेत रियानीबाई झाडाखाली दबून जागीच मरण पावल्या, तर त्यांचे पती, दोन्ही मुले आणि भावाचा मुलगा असे चौघे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. रियानीबाईंच्या नातेवाईकांनी रुग्णालयात केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, बारेला कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

 


 

Next Post
जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

ताज्या बातम्या

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर
आरोग्य

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर

November 26, 2026
शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद
गुन्हे

शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद

November 26, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

November 26, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे
जळगाव जिल्हा

थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे

November 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add