• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुटुंबीय परदेशात, चोरट्यांनी साधली संधी: पिंप्राळ्यात सव्वा लाखांची घरफोडी!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 3, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
कुटुंबीय परदेशात, चोरट्यांनी साधली संधी: पिंप्राळ्यात सव्वा लाखांची घरफोडी!

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा भागात कुटुंब परदेशात गेल्याची संधी साधत चोरट्यांनी एका बंद घराला लक्ष्य केले आहे. दागदागिन्यांसह सुमारे सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. घरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने ही घटना घरमालकाला उघड झाली. याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र दौलतराव वाघे (रा. मारोती पार्क, पिंप्राळा शिवार, जळगाव) हे त्यांच्या पत्नीसह ऑस्ट्रेलिया येथे मुलीकडे गेले आहेत. त्यांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. दरम्यान, रविवार, १ जून रोजी सकाळी ९ वाजता नरेंद्र वाघे यांनी त्यांचे पाहुणे लीलाधर शांताराम खंबायत (वय ५१, रा. पार्वती काळे नगर, जळगाव) यांना फोन करून सांगितले की, घराचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, तुम्ही घरी जाऊन पहा. त्यानुसार, लीलाधर खंबायत यांनी घरी जाऊन पाहिले असता वाघे यांच्या घराचा कडीकोंडा तुटलेला दिसला. सीसीटीव्ही कॅमेरांचा डीव्हीआर काढून नेल्याने चोरटे दिसले नाहीत.

घरात तपासले असता सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यानुसार लीलाधर खंबायत यांनी साडू नरेंद्र वाघे यांना घरफोडी झाल्याची माहिती दिली. घरातील सोन्याची चैन व अंगठ्या असा सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरीस गेलेला दिसून आला आहे. त्यानुसार लीलाधर खंबायत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाघ हे करत आहेत.

Tags: Crime
Next Post
जैन इरिगेशनमध्ये ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन

जैन इरिगेशनमध्ये 'जागतिक तंबाखू विरोधी दिना'निमित्त व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन

ताज्या बातम्या

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली
जळगाव जिल्हा

जळगावच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे यांची नियुक्ती; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group