चोपडा, (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा ग्रामीण पोलिसांनी लासूर गावाबाहेर एका तरुणास विना परवाना गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी रविवारी अटक केली. त्याच्यावर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १८ रोजी लासूर गावाबाहेरील नाटेश्वर मंदिराजवळ विकास काळूबा सोनवणे (वय २५, रा.नेवूर ता. येवला जिल्हा नाशिक) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून २० हजाराचा गावठी कट्टा व दुचाकी असा ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो. नि. कावेरी कमलाकर करीत आहेत.