जळगाव, दि. 08 – परिवर्तन संस्थेच्या वतीने ‘भाऊंना भावांजली’ परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन जळगावात करण्यात आले आहे. यात साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, चित्र अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
पद्मश्री भवरलालजी जैन यांचं उद्योगविश्वासोबत साहित्य, कला, नाट्य, नृत्य हे त्यांचे आवडीचे विषय होते. अशा थोर उद्योगपतीला, विचारवंताला कलेतून आदरांजली वाहण्याची व त्यांच्या कार्याचा जागर करण्याचे परिवर्तन संस्थेने ठरवलं आणि त्यातूनच भाऊंना भावांजली महोत्सव आकाराला आलाय.
भाऊंना भावांजली महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून जळगाव शहरातील स्थानीक कलावंतांनी दिलेली ही भावांजली आहे. जळगाव शहराच्या साहित्य कला संगीत क्षेत्राच्या विकासाठी भाऊंनी वेळोवेळी सहकार्य केलंय. कला ही मानवी विकासाचा सर्वोच्च बिंदू असते. कलेच्या सर्वांगीण विकासातूनच प्रत्येक शहराची ओळख होत असते. म्हणूनच मोठ्याभाऊंनी कला व कलावंत यांना नेहमी पाठबळ व प्रेम दिल.
खान्देशातील सांस्कृतिक विकासामध्ये मोठ्या भाऊंच मोठ योगदान आहे. परिवर्तन जळगाव मोठ्या भाऊनच ऋणातून उतराई होण्यासाठी व भवरलाल भाऊचं स्मरण करण्यासाठीच ‘भावांजली परिवर्तन कला महोत्सवाच’ आयोजन गेल्या पाच वर्षापासून करत आहे. 8 दिवस चालणारा हा सांस्कृतिक मोहत्सव म्हणजे सर्व कलांच्या माध्यमातून खान्देशातील कलावंतांनी भाऊंना वाहिलेली भावांजली आहे.
परिवर्तन जळगाव संस्था सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. हा आठ दिवसीय महोत्सव दि 12 ते 19 डिसेंबर 2021 दरम्यान होणार असून महोत्सवाची सुरवात दि. 12 रोजी भाऊंच्या उद्यानातील आर्ट गॅलरीतील चित्रप्रदर्शनाने होणार आहे तर 13 डिसेंबर रोजी चर्चासत्र रोटरी भवन, मायादेवी नगर येथे होईल. दि. 14 डिसेंबर मंगळवारपासून 19 डिसेंबर पर्यंत कार्यक्रमांचे सादरीकरण भाऊंच्या उद्यानातील ऍम्फी थिएटर मध्ये करण्यात आले आहे.
भावांजली महोत्सवात विविध कला प्रकारांचे सादरीकरण दररोज सायंकाळी 6.30 वा. होणार आहे. अनिलभाई कांकरिया, छबिलदास राणे, अनिषभाई शहा, डॉ रणजित चव्हाण, नंदलाल गादिया, किरण बच्छाव, नारायण बाविस्कर आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव साजरा होणार आहे .
हा महोत्सव सर्वांसाठी खुला असला तरी कोविडं अनुरूप व्यवहार पाळण्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या व प्रवेशिका असलेल्या लोकांनाच महोत्सवात प्रवेश मिळणार आहे .
तरी महोत्सवास नियम पळून उपस्थिती द्यावी असे आवाहन परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी केले आहे.