• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल

सीआयएससीई बोर्डच्या निकालात १२ वीत क्रिषा राठोड तर १० वीत वेद भुसकाडे प्रथम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 2, 2025
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
अनुभूती निवासी स्कूलचा सलग १८ व्यावर्षी १०० टक्के निकाल

जळगाव, (प्रतिनिधी) : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनिशन्सचे (सीआयएससीई) च्या दहावी व बारावी निकाल आज जाहिर करण्यात आले. त्यात अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) ते आतापर्यंत १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. इयत्ता १२ वीत क्रिषा राठोड तर दहावीत वेद जयंत भुसकाडे प्रथम आले आहेत.

दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकालात घवघवीत यश संपादित केले. क्रिषा राठोड ही ९५.०० टक्के गुणांसह पहिली आली आहे. तर आरोही रघुनाथ परांजपे ९३.२५ टक्के गुणांसह द्वितीय तर शाल्मली शैलेंद्र अलमन ९२.२५ तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. यामध्ये ९० टक्यांच्यावर सहा तर ८० ते ९० टक्क्यांमध्ये तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आयसीएसई (दहावी) मध्ये प्रथम क्रमांकाने वेद जयंत भुसकाडे याला ९६.८० टक्के गुण प्राप्त झाले आहे. त्याला रोबोटिक आणि एआयमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळाले. तर दिग्विजय संजय मोरे यांने ९५.४० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक मिळविला. त्याने इंग्रजी साहित्य विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले आहे. अनुष्का अशोक महाजन हिला ९४.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. याशिवाय जयेश केडीया या विद्यार्थ्यांनी इतिहास विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळविले आहे. त्याशिवाय ९० टक्क्यांच्यावर नऊ विद्यार्थी तर ८० ते ९० टक्क्यांदरम्यान १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

भविष्याचे वेध घेत असताना शैक्षणिक अभ्यासक्रमासह आपल्यातील सूप्त कलागुणांना जोपासून विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे प्राप्त केलेले यश गौरवास्पद आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद, शिक्षकतेतर कर्मचारी यांच्यासह पालकांचेही अभिनंदन होत आहे. अनुभूती स्कूलचे संचालक मंडळ, अशोक जैन, अतुल जैन, निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

◾“श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित शैक्षणिक मूल्य जपणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापनेपासून (२००७ पासून) विद्यार्थ्यांनी यंदाही १०० टक्के निकाल राखला. या सुयशाबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन! देशाचे उज्जवल भविष्य विद्यार्थ्यांमध्ये असून निसर्गरम्य वातावरण, स्पर्धात्मक जगाशी सामना करण्याची ताकद अनुभूतीच्या विद्यार्थ्यांत आहे.”
अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

Tags: education
Next Post
स्वतःच्या मुलाला अभ्यास घेताना अमानुष मारहाण ; पालकावर गुन्हा दाखल

स्वतःच्या मुलाला अभ्यास घेताना अमानुष मारहाण ; पालकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add