• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गलवाडे रस्त्यावर ट्रक चालकाची अडवणूक ; गळ्याला चाकू लावून मागितले पैसे

अमळनेर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 28, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची धावत्या बस मधून चोरी

अमळनेर, (प्रतिनिधी) : ट्रक अडवून ट्रक चालकाच्या गळ्याला चाकू लावून एक हजार रुपये हिसकावून, मालकाकडून एक लाख रुपयांची मागणी करत खून करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना गलवाडे रस्त्यावर दि.२७ एप्रिल रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पॅरोलवर सुटलेला गुन्हेगार कैलास नवघरे याला अटक केली आहे.

अनिल अश्रूबा विलग (रा. कोनोसी ता. शिवगाव, जि. अहिल्यानगर) हा चालक स्वप्निल झिने यांचा मालकीचा हायवा ट्रक (क्रमांक एमएच-१६-सीई-४७९७) चालवत होता. भुसावळ येथून फ्लॅश पावडर घेऊन नरडाणा येथे जात असताना गलवाडे रस्त्यावर मोटरसायकलवर आलेल्या तीन जणांनी ट्रक आडवला. त्यापैकी एकाने स्वतःची ओळख ‘कैलास नवघरे अमळनेरचा डॉन’ म्हणून करून दिली. त्याने ट्रकच्या केबिनमध्ये चढून चालकाच्या गळ्याला चाकू लावला आणि एक लाख रुपये मागितले. चालकाच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार रुपये काढून घेतले. दुसऱ्या व्यक्तीने आपले नाव मोझम शेख असल्याचे सांगितले. या टोळीने ट्रक मालकाला फोन करून एक लाख रुपये न दिल्यास खून करण्याची धमकी दिली. चालकानेही मालकाला फोन करून पैसे मागण्याची विनंती केली. ट्रक बाजूच्या कॉलनीत घेऊन जाण्याचा प्रयत्नही झाला.

दरम्यान, चालकाच्या सूचनेवरून मालकाने तात्काळ अमळनेर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र कोठवदे, संतोष पवार, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, सुनील पाटील, योगेश बागुल आणि संजय सोनवणे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच मोझम शेख व तिसरा अनोळखी आरोपी पळून गेला. मात्र, कैलास नवघरे याला तात्काळ अटक करण्यात आली. कैलास नवघरे हा यापूर्वी खून प्रकरणात शिक्षा भोगत असून तो सध्या पॅरोलवर बाहेर आला होता. २७ एप्रिल रोजी त्याला पुन्हा तुरुंगात परत जायचे होते, मात्र त्याआधीच या गुन्ह्यात तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणी तिघांविरुद्ध जबरी चोरी आणि रस्ता अडवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

 


 

Tags: Crime
Next Post
मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक ; अपघातात पितापुत्र ठार

मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक ; अपघातात पितापुत्र ठार

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add