• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रोटरी ईस्टचा ‘जळगाव पॅटर्न’ सर्वांसाठी आदर्श ठरणार

रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश मेहर यांचे प्रतिपादन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 1, 2021
in सामाजिक
0
रोटरी ईस्टचा ‘जळगाव पॅटर्न’ सर्वांसाठी आदर्श ठरणार

जळगाव, दि. 01 – रोटरी क्लब सेवाभावमुळे गरजूसाठी आशेचा किरण ठरत आहे. शहरातील रोटरी क्लबचे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य लक्षात घेता रोटरीचा ‘जळगाव पॅटर्न’ सर्वत्र आदर्श ठरेल, असा विश्वास रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश मेहर (नाशिक) यांनी व्यक्त केला.

रोटरी क्लब जळगाव ईस्टच्या ऑफिसियल क्लब व्हिजिटनिमित रमेश मेहेर यांच्या मुख्य उपस्थितीत गणपतीनगरमधील रोटरी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या कार्याचा परिचय असिस्टंट गव्हर्नर विष्णू भंगाळे यांनी करून दिला. या क्लबचे हे सिल्वर जुबली इयर असल्याने विशेष कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.

क्लबतर्फे आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रम व घेतलेल्या कार्यक्रमांची माहिती आणि आगामी कालावधीचे नियोजन क्लबचे अध्यक्ष सीए वीरेंद्र छाजेड यांनी सांगितले. क्लबचे सचिव प्रणव मेहता यांनी विविध सामाजिक, लोकोपयोगी, विद्यार्थी हितांच्या कार्याची माहिती दिली.

क्लबतर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला, पूजा की थाली, फुलांच्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्र. पूर्वा साखला, दुसरा क्र. धनश्री जाधव, तृतीय क्र. हेमांगी गणंत्रा, पूजा की थाळी स्पर्धेत प्रथम क्र. वनिता सोनी, द्वतिय क्र. रजनी पहरिया, तृतीय क्र. अर्चना मेघणानी, तर फुलांच्या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्र. धनश्री जाधव, दवतिय क्रमांक विधी आणि उन्नती लुंकड, तृतीय क्रमांक शौर्य मेहता व पलक शहा यांनी प्राप्त केला आहे. त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. धनश्री मेहता हिने गणेश वंदना, तर स्वागत नृत्य आशि अग्रवाल हिने सादर केली.

नूतन सदस्य मयूर ओस्तवाल यांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.राहुल भन्साळी यांनी केले. तर आभार संग्रामसिंह सूर्यवंशी यांनी केले.

या वेळी फस्ट लेडी ऑफ क्लबच्या प्रियांका छाजेड, मोनिका मेहता, असिस्टंट गव्हर्नर संगीता पाटील, महेंद्र अग्रवाल, राजेश साखला, पूजा अग्रवाल, निता परमार, बबिता मंधांन, प्रणाली साखला, प्राजक्ता वैद्य, वर्धमान भंडारी, प्रीती चोरडिया, विनोद पाटील-भोईटे, डॉ.जगमोहन छाबडा, डॉ.अमेय कोतकर, अमरनाथ चौधरी, हेमंत छाजेड, अभय कांकरिया, रवी कांकरिया, संजय गांधी, संजय शहा आदी उपस्थित होते.


 

Next Post
नांद्रा येथील जन्मताच कर्णबधिर बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

नांद्रा येथील जन्मताच कर्णबधिर बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामातून १० गॅस सिलिंडर चोरी

August 25, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बोदवडमध्ये घरफोडी; २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

August 25, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; २२ वर्षीय संशयिताला अटक

August 25, 2026
आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
खान्देश

आयशरच्या धडकेत १० वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

August 25, 2026
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
जळगाव जिल्हा

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026
माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले
जळगाव जिल्हा

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add