• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चुंचाळे येथे कृषी विभागाची मोठी कारवाई ; १८ लाखांचे बनावट कापूस बियाणे जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 24, 2025
in कृषी
0
चुंचाळे येथे कृषी विभागाची मोठी कारवाई ; १८ लाखांचे बनावट कापूस बियाणे जप्त

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित असलेले सुमारे १८ लाख रुपये किमतीचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणे जप्त केले आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी किरण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे, समा तडवी यांच्या पथकाने चुंचाळे येथील संशयित आरोपी नितीन नंदलाल चौधरी यांच्या चुंचाळे-अक्कुलखेडा रोडवरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.

या कारवाईत प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्याचे १२७३ पाकिटे, ज्याची किंमत १७ लाख ८२ हजार २०० रुपये आहे, असा मोठा साठा जप्त करण्यात आला. संशयित आरोपी नितीन चौधरी याच्यावर बियाणे कायदा, बियाणे नियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहेत.

Next Post
मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो सांगत सेवानिवृत्त पोलीसाची साडेनऊ लाखात फसवणूक

मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो सांगत सेवानिवृत्त पोलीसाची साडेनऊ लाखात फसवणूक

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add