• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; ४ महिलांची आशादीप वस्तीगृहात रवानगी

जळगावात पोलिसांची धडक कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 19, 2025
in गुन्हे
0
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; ४ महिलांची आशादीप वस्तीगृहात रवानगी

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या नयनतारा मार्केट मॉल येथे स्पा सेंटर मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर एलसीबीसह जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली आहे. एकूण ४ महिलांची सुटका करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर त्याच्यासह हरियाणाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ नयनतारा ऑर्किड मॉल येथे दुकान नंबर ४०८ मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय चालतो अशी माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या मदतीने मसाज सेंटरवर छापा टाकण्यासाठी बनावट ग्राहक पाठवला. तिथे संशयित राजू मधुजी जाट (रा.कलोधिया ता. पिंपरी जि. भीलवाडा,राजस्थान) याने बनावट ग्राहकाला व्यतिरिक्त इतर सेवा देण्यासाठी आमिष दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

छाप्यामध्ये ४ महिलांच्या मार्फत पाच सेंटरच्या विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसले. त्याचा मालक संशयित विक्रम राजपाल चंदमारी धानी (वय २० वर्ष रा. चत्तरगढ पत्ती जि. सिरसा, हरियाणा) हा व्यवसायाला प्रोत्साहन देत होता. म्हणून दोघांविरुद्ध पिटा ऍक्ट प्रमाणे जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजर राजू जाट याला अटक करण्यात आली आहे. तर सदर महिलांना आशादीप महिला वस्तीगृहात पाठवण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही जळगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी, सपोनी शितल कुमार नाईक, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक निरीक्षक महेश घायतळ, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनील पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली महाजन, हेडकॉन्स्टेबल प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक दीपक चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

Tags: Crime
Next Post
गंभीर ‘जीबीएस’ आजारातून बालिकेला मिळाला पुनर्जन्म

गंभीर 'जीबीएस' आजारातून बालिकेला मिळाला पुनर्जन्म

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलाचा विवस्त्र व्हिडीओ व्हायरल; दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गुन्हे

अल्पवयीन मुलाचा विवस्त्र व्हिडीओ व्हायरल; दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

July 13, 2025
प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group