• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गंभीर ‘जीबीएस’ आजारातून बालिकेला मिळाला पुनर्जन्म

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाला यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 19, 2025
in आरोग्य
0
गंभीर ‘जीबीएस’ आजारातून बालिकेला मिळाला पुनर्जन्म

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जीबीएस आजाराने बाधित गंभीर बालकावर यशस्वी उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल बालरोग विभागाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.

रावेर तालुक्यातील नांदूरखेडा येथील ११ वर्षीय बालिका सोनाली पाटील हिला हातापायांच्या कमजोरीमुळे शरीराची हालचाल करण्यास आणि वस्तू पकडण्यास कमजोरी जाणवत होती. तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. सदर बालिकेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाअंतर्गत अत्याधुनिक बालरोग अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले.

विविध तपासण्या केल्यानंतर सदर बालिकेला जीबीएस म्हणजेच गुलियन बारे सिंड्रोम या आजाराचे निदान झाले. या बालिकेला श्वसनाचा त्रास आणि गिळायला त्रास असल्यामुळे तात्काळ व्हेंटिलेटर लावण्यात आले. दरम्यान, तिला न्यूमोनिया असल्याचे देखील निदान तपासणीत झाले. सदर बालिकेवर सातत्याने २१ दिवस बालरोग तज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट आदी तज्ज्ञांच्या एकत्रित परिश्रमाने यशस्वी उपचार करण्यात आले.

७ दिवसानंतर सदर बालिकेचे व्हेंटिलेटर निघून तिला ऑक्सिजन लावण्यात आला. या आजारामुळे होणारे संभाव्य धोके यशस्वी उपचारामुळे दूर झाले. २१ दिवसाच्या अथक उपचारानंतर सदर बालिकाला पूर्ववत हालचाल करण्यास, श्वास घेण्यास सोपे झाले. यानंतर सदर बालिकेला १५ एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सदर बालिकेवर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, सहाय्यक प्रा. डॉ. गिरीश राणे, डॉ. इंद्राणी मिश्रा, इन्चार्ज परिचारिका श्रद्धा सपकाळ आणि संगीता शिंदे यांच्या सर्व वैद्यकीय पथकाने, कर्मचारी वर्गाने यशस्वी उपचार होण्यासाठी परिश्रम घेतले.

जीबीएस व इतर कोणताही गंभीर आजार असल्यास तत्काळ वेळेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोग विभागात उपचारासाठी यावे. आपल्याकडे अद्ययावत सुविधा व तज्ज्ञ टीम असल्याने रुग्ण वाचविण्यास मदत होते, असे विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी सांगितले.


 

Tags: #jalgaon_cityKhandesh Prabhatखान्देश प्रभात
Next Post
फुकट्या रेल्वे प्रवाशांवर धडक कारवाई ; भुसावळ विभागात ६ लाख १८ हजारांचा दंड वसूल

फुकट्या रेल्वे प्रवाशांवर धडक कारवाई ; भुसावळ विभागात ६ लाख १८ हजारांचा दंड वसूल

ताज्या बातम्या

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी
जळगाव जिल्हा

जळगावात बीव्हीजी कंपनीच्या कारभारावर नगरसेवक संतप्त; चौकशीची मागणी

October 21, 2026
प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी
गुन्हे

प्रेमसंबंधांच्या वादातून जळगावात मध्यरात्री गोळीबार, ३५ वर्षीय महिला गंभीर जखमी

October 21, 2026
गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर
गुन्हे

गरबा-दांडिया कार्यक्रमात वाद; चाकूहल्ल्यात एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

October 21, 2026
सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार
खान्देश

सणासुदीत जळगावकरांना रेल्वेचा दिलासा! पानिपतसाठी विशेष गाडी धावणार

October 21, 2026
जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add