• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रामनगर घरफोडीप्रकरणी दोघं संशयितांना अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव शहरात झाली होती घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 3, 2025
in गुन्हे
0
रामनगर घरफोडीप्रकरणी दोघं संशयितांना अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील रामनगर येथील घरफोडीप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपीना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार दि. ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरात रामनगर येथील ऋषीकेश दिलीप येवले यांच्या राहते घराचा कड़ी कोडा तोडून दि. १५ मार्च रोजी ७ वाजेपासून ते दि. १७ रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व प्रत्येकी ०५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या चोरी केल्या होत्या. यासंदर्भात ऋषीकेश दिलीप येवले यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात आरोपीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची चोरी ही रेकॉर्डवरील गुन्हेगार अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक (रा. उमर कॉलनी, बरकत मशिदजवळ, जळगाव) याने केल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्याप्रमाणे दि. १ एप्रिल रोजी अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक यास उमर कॉलनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देवून सदरचा गुन्हा हा त्याचा दुसरा साथीदार समीर उर्फ तात्या शेख सलीम, (रा.अली मशीद समोर, हुडको पिंप्राळा, जळगाव) याच्या सोबत केल्याचे सांगीतल्याने त्याला देखील ताब्यात घेण्यात आले.

सदर गुन्ह्याच्या तपासात २० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले असून संशयित आरोपी यांना पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.५ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे, सहा. फौजदार राजेश मेढे, रवि नरवाडे, अतुल वंजारी, पोहेकों प्रविण भालेराव, विजय पाटील, हरीलाल पाटील, महेश पाटील, सागर पाटील, चालक प्रमोद ठाकुर अशांनी केली आहे. संशयित आरोपी अबरार उर्फ चिरक्या हमीद खाटिक याचेवर ०४ गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोहेकों/जितेंद्र राठोड हे करीत आहेत.

 


 

Next Post
राज्यात ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू ; वारसांच्या नोंदी अद्ययावत करून घेण्याचे आवाहन

राज्यात 'जिवंत सातबारा' मोहीम सुरू ; वारसांच्या नोंदी अद्ययावत करून घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add