• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गच्चीवर झोपणे पडले महागात ; घरातून ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास !

चाळीसगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 31, 2025
in गुन्हे
0
गच्चीवर झोपणे पडले महागात ; घरातून ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास !

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : कुटुंब गच्चीवर झोपल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरात घुसून रोकडसह सोन्याचे दागिने असा सुमारे ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील तळेगाव येथे घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्धव अर्जुन शिंगाडे (रा. तळेगाव) हे दि. २७ रोजी रात्री ८ वाजता जेवण करून कुटुंबासह गच्चीवर झोपण्यास गेले. त्यांचे आई-वडील घराबाहेर अंगणात झोपलेले होते. शिंगाडे हे मध्यरात्री २ वाजता चार्जिंगसाठी लावलेला मोबाइल घेण्यास गच्चीवरून घरात आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच किचनमधील दरवाजाची कडी तुटलेली दिसली. घरातील बेडरूममध्ये जावून पाहिले असता लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटाच्या लॉकरमधील स्टीलच्या डब्यात ठेवलेले ३४ हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची मणी असलेली सोन्याची पोत व रोख ४० हजार रुपये असा सुमारे ७४ हजार रुपयांचा ऐवज दिसून आला नाही.

अज्ञात चोरट्याने किचनमधील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला व बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेला ७४ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार दि. २७ रोजी रात्री ११:३० ते २८ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी उद्धव शिंगाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार राजेश रावते हे करीत आहेत.

Next Post
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार प्रदान

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे विशेष वाड्मय व नाट्य पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन
जळगाव जिल्हा

पटेल नगरचा पाणीप्रश्न सुटणार; नवीन जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

April 21, 2026
JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!
क्रिडा

JCL T-20 चा थरार : पाचोरा, चाळीसगाव आणि सातपुडा हिरोजची मैदानात बाजी!

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group