• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वे आरक्षणच्या ई-तिकिटांचा काळाबाजार ; तरुणाला अटक

पोलिसांनी केली ४ लाखाची तिकिटे, मोबाईल जप्त ; चाळीसगावात गुन्हा नोंद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
रेल्वे आरक्षणच्या ई-तिकिटांचा काळाबाजार ; तरुणाला अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : पुणे सायबर सेलने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश केला आहे. संशयास्पद युजर आयडीच्या मदतीने तिकिटे बनविणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

संशयित आरोपीचे नाव ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय ३८,वर्षे, रा. मुकटी, ता. धुळे) असे आहे. बुधवार दि. २६ रोजी पुणे सायबर सेलकडून रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या काळाबाजारामध्ये संलग्न असलेल्या संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यानुसार रेल्वे संरक्षण दल चौकी, धुळे अंतर्गत चाळीसगाव येथे गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष तपास पथकाने आरोपीकडून २४३ ई-तिकिटे जप्त केली आहेत. या तिकीटांची एकूण किंमत ४ लाख २० हजार ९६२ रुपये आहे. यात ८८ आगाऊ प्रवासाची तिकिटे, ज्याची किंमत १ लाख ७८ हजार २१३ आणि १५५ प्रवास पूर्ण झालेली तिकिटे ज्याची किंमत २ लाख ४२ हजार ७४८ रुपये आहे.

तसेच, अवैध तिकिट बुकिंगसाठी वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाइल फोन देखील जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून नोटीस देऊन त्याला सोडण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक, चाळीसगाव यांच्या नेतृत्वाखाली, एसआयपीएफ आर. के. सिंग, राजेंद्र भामरे व आरक्षक राकेश खलाणे यांच्या विशेष पथकाने केली. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे हे पुढील तपास करीत आहेत.

Next Post
चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ ; पाडवा पहाटला रसिकांचा प्रतिसाद

चैत्र पालवी स्वरोत्सवाने नव वर्षास आरंभ ; पाडवा पहाटला रसिकांचा प्रतिसाद

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group