चोपडा, (प्रतिनिधी) : येथील गुजरअळी भागातील जवान चेतन पांडुरंग चौधरी मणिपूर राज्यातील बस अपघातात शहिद झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. सोमवारी दि. १७ रोजी त्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बीएसएफ जवानांसह जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
मणिपूर राज्यात झालेल्या बस अपघातात ३ जवान शहिद झाले आहेत. यात चेतन चौधरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थिव चोपड्यात आणल्यानंतर शिरपूरकडून येत असताना चोपडा येथील प्रताप विद्यामंदिर कस्तुबा माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी शहीद जवानाच्या पथि॔ववर पुष्पवृष्टी केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहीद जवानचे पार्थिव नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. राहत्या घरी मुखदर्शनासाठी शहीद जवानाचे पार्थिव परिवाराला देण्यात आले.
जळगाव पोलीस दलातर्फे सलामी घेऊन सजवलेला ट्रॅक्टरवरती शहीद जवानांच्या पार्थिव व परिवारासह पत्नी, दोन्ही मुलं, आई वडील, भाऊ व नातेवाईक सोबत होते. शहीद जवानांच्या रॅलीत दोनशे फूट तिरंगा होता. ‘शहीद जवान अमर रहे, अमर रहे’च्या घोषणा देत महिलांसह ध्वज घेऊन चालत होते. रॅली, मार्गात घरापासून ठीकठिकाणी शहीद जवानावरती पुष्पदृष्टी करण्यात येत होती.