• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वेत चढताना तोल जावून पडल्याने दुर्दैवी मृत्यू ; जळगाव रेल्वेस्थानकावरील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 12, 2025
in जळगाव जिल्हा
0
रेल्वेत चढताना तोल जावून पडल्याने दुर्दैवी मृत्यू ; जळगाव रेल्वेस्थानकावरील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : रावेरहून जळगावला आलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीचा परत रावेरला जात असताना, जळगाव रेल्वे स्थानकात आल्यावर रेल्वेत चढताना तोल जावून रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अनिल राजाराम जाधव (वय ३६) असे मयत इसमाचे नाव आहे. रावेर शहरात पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पत्नी जळगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात माहेरी आल्या होत्या. (केपी)त्यात दोन दिवसांपुर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथील सासरवाडीला आलेले होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी रात्री ९ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर रावेर येथे जाण्यासाठी आले होते.

त्यावेळी रात्री ९ वाजता कामायनी एक्सप्रेसमध्ये चढत असतांना त्यांचा तोल गेल्याने ते रेल्वेखाली आले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Next Post
आकाशवाणी चौकातील अपघातग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

आकाशवाणी चौकातील अपघातग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

ताज्या बातम्या

दिवाळीनिमित्त जळगाव शहरात मोकळ्या प्लॉटमधील स्वच्छता मोहीम
खान्देश

दिवाळीनिमित्त जळगाव शहरात मोकळ्या प्लॉटमधील स्वच्छता मोहीम

October 26, 2026
शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
खान्देश

शहर स्वच्छतेसाठी महापौर दीपमाला काळे आक्रमक; काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

October 26, 2026
मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान; चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ
खान्देश

मोतीबिंदू मुक्त जळगाव जिल्हा’ अभियान; चोपड्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा प्रारंभ

October 26, 2026
कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने २१ वर्षीय तरुणाचा खून!
गुन्हे

कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने २१ वर्षीय तरुणाचा खून!

October 26, 2026
मालमत्ता करात डिसेंबरपर्यंत ३ टक्के सूट; जानेवारीपासून दंड
जळगाव जिल्हा

मालमत्ता करात डिसेंबरपर्यंत ३ टक्के सूट; जानेवारीपासून दंड

October 26, 2026
पाळधीजवळ भीषण अपघात ! १०० फूट उंचीवरून क्रेन कोसळली; चालकाचा मृत्यू
गुन्हे

क्रेन अपघात : ऑपरेटर, ठेकेदाराविरोधात गुन्हा

October 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add