• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भावाच्या पत्नीवर चुलत भावाने केला अत्याचार !

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केली अटक

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 3, 2025
in गुन्हे
0
भावाच्या पत्नीवर चुलत भावाने केला अत्याचार !

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावाच्या शिवारामध्ये पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आलेल्या चुलत जेठाने त्याची तरुण पत्नी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर टॉवेलने तोंड दाबून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावामध्ये १९ वर्षीय विवाहिता पतीसोबत राहते. शेतीकाम करून तिचा परिवार उदरनिर्वाह करतो. दरम्यान शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास तरुण विवाहिता घरी एकटी होती. त्यावेळेला तिच्या पतीसाठी जेवणाचा डबा घेण्याकरिता तरुणीचा चुलत जेठ संजय (वय ४१) हा आला. त्याने तरुणीवर वाईट नजर ठेवून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत टॉवेलच्या साह्याने फिर्यादी तरुणीचे तोंड दाबून जबरदस्तीने बलात्कार केला.

या प्रकरणी शनिवार दि. १ मार्च रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी संजय याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. दरम्यान बलात्काराच्या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Next Post
परप्रांतीय चटई कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

परप्रांतीय चटई कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group