जळगाव, (प्रतिनिधी) : रामद्वारा जगतपालतर्फे आदि सतगुरू सुखरामजी महाराज यांच्या प्रगट दिन (गुरूनवमी) निमित्ताने अखंड नामस्मरणाचे आयोजन बुधवार पासून करण्यात आले आहे.
दि.२६ फेब्रुवारी २०२५ पासून ते ६ एप्रिल २०२५ पर्यंत या अखंड नामस्मरणाचे आयोजन आकाशवाणी चौक, कांचन नगर तसेच सिव्हिल हॉस्पिटल जवळील रामद्वारा येथे सुरू आहे. नामस्मरणाची सुरूवात आज सकाळी ७.०० वाजेला गुरूमहिमा व पदगायन करून सुरु करण्यात आले. या नंतर राम नामाचा अखंड नामस्मरण करण्यात आले. यावेळी जगतपाल चांडक गुरुजी आणि सर्व रामस्नेहींनी हजर होते.
शहरांतील जास्तीत जास्त नागरिकांना नामस्मरणाचा लाभ घ्यावा, तसेच जवळच्या रामद्वारा येथे आपण संपर्क साधावा असे आवाहन आयोजकातर्फे राज सुर्यवंशी यांनी कळविले आहे.