पुणे, दि. 15 – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर सखोल अभ्यास करणारे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दरम्यान त्यांना न्युमोनियाची लागण देखील झाली होती. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
न्युमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बाबासाहेब पुरंदरे काही दिवसांपूर्वी घरात पडले होते, त्यानंतर दिनानाथ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अशी माहिती बाबासाहेब यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी दिली.
अलीकडेच पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील सर्वच नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच दोन महिन्यांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात त्यांच्या निवास्थानी जाऊन पुरंदरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली होती.