• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सव्वा पाच लाखांची एमडी ड्रग्ज जप्त; तरूणाला मुद्देमालासह अटक !

जळगावच्या शाहू नगरात पोलिसांची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 24, 2025
in गुन्हे
0
सव्वा पाच लाखांची एमडी ड्रग्ज जप्त; तरूणाला मुद्देमालासह अटक !

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील शाहू नगर भागात एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला शहर पोलिसांनी कारवाई करून अटक केली आहे. ५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, शाहू नगरातील एका घरात एमडी ड्रग्जचा साठा करून विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी, २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलिसांनी शाहू नगर येथे छापा टाकून सर्फराज जावेद भिस्ती (वय-२३, रा. शाहू नगर, जळगाव) याच्या घरातून ५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला. पोलिसांनी त्याच्या घरातून दोन पुड्या हस्तगत केल्या असून, सर्फराज जावेद भिस्ती याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस तपासात समोर आले आहे की, सर्फराज जावेद भिस्ती याच्यावर यापूर्वीही आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हा संशयित आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्याने हे ड्रग्ज कुठून आणले, त्याचा पुरवठादार कोण आहे आणि नेमकी कोणाला विक्री करत होता याचा तपास पोलीस करत आहेत. कारवाईत शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, सुनील पाटील, रणजीत पाटील आणि पोलीस कर्मचारी सतीश पाटील, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, चंद्रकांत सोनवणे, उद्धव सोनवणे, प्रणय पवार, अमोल ठाकूर आणि विजय निकुंभ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Next Post
एमआयडीसीतील कंपनीतून ३ लाखांची रोकड लंपास

एमआयडीसीतील कंपनीतून ३ लाखांची रोकड लंपास

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group