• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुचाकी सह चोरटा अटकेत ; २ दुचाकी जप्त

भडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 22, 2025
in गुन्हे
0
दुचाकी सह चोरटा अटकेत ; २ दुचाकी जप्त

भडगाव, (प्रतिनिधी) : भडगाव पोलिसांनी वडजी येथील एका तरुणाला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेली असून या दुचाकी चोराकडून २ दुचाकी हस्तगत करण्यात भडगाव पोलिसांना यश आले आहे.

भडगाव शहरातून बाळद रोड येथील फिर्यादी यांच्या दुकानासमोरुन दि.२४ रोजी सकाळी फिर्यादीची १० हजार रुपये किमतीची एक बजाज कंपनीची सी.टी. १०० लाल रंगाची (मोटार सायकल क्र. एम.एच.१९.ए.एन.१०९६) मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. यावरुन भडगाव पोलीस स्टेशनला फिर्यादी शेख मुनाफ शेख युसुफ (वय ३५, रा. हकीन नगर, भडगाव) यांचे फिर्यादवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील मोटार सायकल ही सत्यपाल दत्तात्रय निकम (रा. वडजी ता. भडगाव) याने चोरुन नेली, अशी माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी सदर संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर संशयित आरोपीने ५ गुन्हे केल्याची कबूल दिली असून त्याला अटक करण्यात येवून पोलीस कस्टडी घेण्यात आली. सदर गुन्ह्यात मोटर सायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच अटकेत असतांना इतर ठिकाणावरुन अजुन एक मोटर सायकल अशा दोन मोटर सायकल चोरी केल्याची पोलीस कस्टडीमध्ये कबुली दिल्याने दोन मोटर सायकली जप्त करण्यात आलेल्या आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, स.फौ. प्रदीप चौधरी, पोहेकी निलेश ब्राम्हणकर, पोको सुनिल राजपूत, पोको प्रविण परदेशी यांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास सफौ प्रदीप चौधरी हे करीत आहेत.

Next Post
सी. ए. शाखेचा पद हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न ; मंत्री गुलाबराव पाटलांची उपस्थिती

सी. ए. शाखेचा पद हस्तांतरण सोहळा उत्साहात संपन्न ; मंत्री गुलाबराव पाटलांची उपस्थिती

ताज्या बातम्या

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group