• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कुटुंबीय गेले लग्नाला : चोरटयांनी केली घरफोडी !

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 19, 2025
in गुन्हे
0
कुटुंबीय गेले लग्नाला : चोरटयांनी केली घरफोडी !

जळगाव, (प्रतिनिधी) : मावसबहिणीच्या लग्नासाठी मलकापूर येथे गेलेल्या व्यावसायिकाच्या घरात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डल्ला मारला. त्यांच्या घरातून चोरट्यांनी साडेतीन तोळे सोने आणि सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्याने मुंगड यांच्या घरातून कपड्यांसह फरसाण व फळे देखील चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीनिवास नारायण मुंगड (वय ३६) हे शहरातील धनाजी काळे नगरात आईसह वास्तव्यास असून त्यांचा टूरिस्टसाठी वाहने भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय आहे. रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मावस बहिणीचे लग्न असल्यामुळे श्रीनिवास हे शनिवारी लग्नासाठी घराला कुलूप लावून मलकापूर येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने श्रीनिवास यांच्या घराच्या कंपाऊंडमधून उडी मारून घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोकड घेऊन चोरटा पसार झाला.

सोमवारी सकाळी त्यांच्या वाहनावर असलेला चालक मयूर सोनार (रा. साकळी, ता. यावल) हा वाहन घेण्यासाठी मुंगड यांच्या घरी आला. यावेळी त्याला मुंगड यांच्या घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आल्याने घरात घरफोडी झाल्याचे लक्षात आले. घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसल्याने चालक सोनार याने मालकाला फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार मुंगड यांनी तात्काळ जळगाव गाठले आणि त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते.

Next Post
चाकूने भोसकून तरूणाचा निर्घृण खून ; संशयित अटकेत

चाकूने भोसकून तरूणाचा निर्घृण खून ; संशयित अटकेत

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव जिल्हा

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 24, 2026
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव जिल्हा

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

June 24, 2026
डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित
जळगाव जिल्हा

डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित

June 24, 2026
भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

June 24, 2026
गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर
शैक्षणिक

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group