• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये चोरी करणाऱ्या ५ संशयितांना अटक

एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून २ गुन्हे उघड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 19, 2025
in गुन्हे
0
एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये चोरी करणाऱ्या ५ संशयितांना अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी परिसरातील दोन विविध कंपन्यांमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करीत दोन्ही गुन्ह्यातील एकूण ५ संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर संशयित आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एमआयडीसी परिसरातील साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीतून ३ लाख ३ हजार रुपयांचे तांब्याचे व अल्युमिनियमच्या वायरी, इलेक्ट्रिक मोटार व इतर साहित्य मुद्देमाल चोरी झाला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर एन ९८ मधील महालक्ष्मी युनि एक्झिम कंपनीतील ५० हजार रूपये किमतीचे २ किलो चांदीचे साहित्य आणि ६० हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरीस गेला होता. या दाखल गुन्ह्याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणण्याचे सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीत चोरी करणारे संशयित आरोपी उमेश उर्फ भावड्या संतोष राजपूत (रा. सुप्रीम कॉलनी), आकाश सुरेश शिंदे (रा. साईनगर, कुसुंबा) आणि पृथ्वीराज उर्फ डुबऱ्या बच्चन बागडे यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, कॉन्स्टेबल योगेश घुगे करीत आहेत.

तर महालक्ष्मी युनि एक्झिम या कंपनीत चोरी करणारे संशयित प्रकाश उर्फ गिड्डा काळू राठोड, गोविंदा उर्फ लल्ला देविदास ढालवाले (दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांनी आणखी ३ साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दोन्ही संशयित आरोपींनी त्यांच्या वाटेवर आलेल्या ३५ हजार रुपयांपैकी एकूण २२ हजार रुपये काढून दिले आहे. इतर फरार संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक राहुल तायडे, नाईक योगेश बारी करीत आहेत

सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, किशोर पाटील, सिद्धेश्वर डापकर, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर, योगेश घुगे आदींनी परिश्रम घेतले आहे.

Next Post
कुटुंबीय गेले लग्नाला : चोरटयांनी केली घरफोडी !

कुटुंबीय गेले लग्नाला : चोरटयांनी केली घरफोडी !

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह उत्साहात

June 24, 2026
बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
जळगाव जिल्हा

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

June 24, 2026
कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव जिल्हा

कचरा डेपोवर मनपाचा वजन काटा अखेर सुरू; उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पाठपुराव्याला यश!

June 24, 2026
डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित
जळगाव जिल्हा

डॉ. प्रीतीश चौधरी ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित

June 24, 2026
भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण
जळगाव जिल्हा

भोकर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनालिका पवार यांच्या पुढाकारातून वृक्षारोपण

June 24, 2026
गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर
शैक्षणिक

गोदावरी स्कूलमध्ये नर्सरी विभागाचे उत्साहात उद्घाटन; सुसज्ज वर्गखोल्या आणि अत्याधुनिक सुविधांवर भर

June 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group