• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तरुणीच्या मृत्यूमागील रहस्य उलगडले, पोलिसांनी केली मित्राला अटक !

पुण्यातील ताथवडे येथील घटना उघड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 18, 2025
in गुन्हे
0
तरुणीच्या मृत्यूमागील रहस्य उलगडले, पोलिसांनी केली मित्राला अटक !

पुणे (वृत्तसेवा) : पुण्यात इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या तरुणीने ताथवडे येथे ५ जानेवारी २०२५ रोजी १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तपासादरम्यान, प्रेमसंबंधातून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने हि आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी तरुणीच्या मित्राला अटक करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सहिती कलुगोटाला रेड्डी (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. याप्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित प्रणव राजेंद्र डोंगरे याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सहिती हिने ५ जानेवारी रोजी राहत्या इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुरुवातीला पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, सहिती हिचे मित्र-मैत्रिणी फिर्यादी कलुगोटाला रेड्डी यांना भेटण्यासाठी आले.

त्यावेळी त्यांनी सहिती हिने मृत्युपूर्वी तिच्या मोबाईलवरून मैत्रिणीला मोबाईलचा पासवर्ड आणि सोसायटीमधील मित्राचा नंबर शेअर केला असल्याचे सांगितले. त्यानुसार कुटुंबीयांनी सहितीचा मोबाईल फोन अनलॉक केला. त्यामध्ये सहितीने मित्र प्रणव, आई-वडील आणि इतर मित्रांसाठी असे तीन व्हॉइस रेकॉर्डिंग करून ठेवले होते. सहिती आणि तिचा वर्गमित्र प्रणव यांचे प्रेमसंबंध होते. सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी प्रणव डोंगरे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Next Post
राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार

राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
खान्देश

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गुन्हे

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add