जळगाव, (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष सुरज विजयराव नारखेडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून जळगाव जिल्हा जनसंपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
महासंघाच्या दि. ४ फेब्रुवारी ला झालेल्या महत्वपूर्ण बैठकी मध्ये हा निर्णय घेण्यात आला. सुरज विजयराव नारखेडे यांना फेडरेशनचे पत्र प्राप्त झाले असून याबाबत त्यांनी माध्यमांना कळविले आहे. दरम्यान महासंघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा व अभिनंदन पर ठराव सुद्धा करण्यात आला व त्यासंदर्भात महारष्ट्रातील अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सर्व सन्मानीय कोअर कमिटी ने दूरध्वनी द्वारे सुरज नारखेडे यांना शुभेच्छा दिल्या.
जळगाव जिल्ह्यातील माहिती अधिकार कायदा महासंघ माहिती अधिकार २००५ च्या अन्नव्य होणाऱ्या अनेक अडचणी किंवा त्यासंदर्भात माहिती लपविणे किंवा शासकीय कामात दिरंगाई करणे व सामान्य नागरिकांना होणाऱ्या अनेक शासकीय कार्यातील अडचणी सोडविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना याबाबत मदत करणार असून नारखेडे यांनी सांगितले.