• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विराज कावडीया यांची युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदी निवड

प्रथमच जळगाव जिल्ह्याला युवासेनेच्या राज्य कार्यकारणीत स्थान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 9, 2021
in राजकीय
0
विराज कावडीया यांची युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदी निवड

जळगाव, दि. 09 – जळगाव शहरातील विराज अशोक कावडीया यांची युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदावर निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना प्रमुख राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ही निवड जाहीर केली आहे.

शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आजवर केलेल्या वाटचालीचे हे फळ आहे. पक्षश्रेष्ठींनी युवासेनेच्या विस्तारासाठी दिलेली ही संधी आव्हानातमक आणि मोठी आहे. शिवसेना, युवासेनेचे सर्व पदाधिकारी, सहकारी तसेच शिवसैनिकांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास विराज कावडीया यांनी व्यक्त केला आहे.

विराज कावडीया हे वयाच्या १६व्या वर्षांपासून म्हणजेच विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. युवाशक्ती फाउंडेशनची सन २००८ साली स्थापना करीत त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. विराज कावडीया यांना २०१५ साली महाराष्ट्र शासनाचा आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असतानाच, कावडीया हे सतत शिवसेनेच्या वाढीसाठी व नागरिकांच्या हितासाठी शहरात अग्रेसर राहून कार्य करीत होते.

याचीच दखल घेत त्यांना अलीकडेच जळगाव शहर महानगरपालिकेत शिवसेनेच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक पद जाहीर करण्यात आले असून लवकरच याची अधिकृत प्रक्रिया येणाऱ्या महासभेत पूर्ण होणार आहे. या सर्व सक्रिय व सकारत्मक कामाच्या पार्श्वभूमीवर त्यांना युवासेनेच्या राज्यस्तरावर सहसचिव म्हणून महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवासेनेच्या स्थापने पासून प्रथमच जळगाव जिल्ह्याला, युवासेनेच्या राज्य कार्यकारणीत पद प्रदान करण्यात आले आहे.

दरम्यान नियुक्तीचे अभिनंदन व स्वागत माजी मंत्री सुरेश दादा जैन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, अजिंक्य चुंभळे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख हर्षल माने, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना युवती विस्तारक डॉक्टर प्रियांका पाटील, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील व सर्व शिवसेना आमदार व पदाधिकारी यांनी केले आहे.


 

Next Post
एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add