• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता

संपूर्ण भारतातून आठ संघांचा सहभाग, पहिल्याच प्रयत्नात जैन सुप्रिमोज संघाची बाजी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 21, 2025
in क्रिडा
0
डेक्कन प्रीमियर कॅरम लीगमध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्सचा ‘जैन सुप्रिमोज कॅरम’ संघ विजेता

जळगाव, (प्रतिनिधी) : डेक्कन प्रीमियर कॅरम लीग सीझन-३ संपला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या ‘जैन सुप्रिमोज’ कॅरम संघाने पहिल्यांदाच सहभाग घेतला. पहिल्याच प्रयत्न अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत विजय खेचून आणला. संपूर्ण भारतातून आठ संघ या स्पर्धेत होते. त्यातील स्ट्राईकफोर्स संघाला अंतिम सामन्यात ३-२ अशा फरकाने नमवित निमाखात विजेतेपदाला ‘जैन सुप्रिमोज’ संघाने गवसणी घातली.

विशाखापट्टणम् येथील एसथ्री स्पोर्टस एरिना येथे डेक्कन प्रिमियर कॅरम लीग स्पर्धा दि. १७ ते १९ जानेवारी दरम्यान संपन्न झाली. जैन इरिगेशनच्या ‘जैन सुप्रिमोज’ संघात कर्णधार संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, गौतम भोई, कु. एम. एस. के. हरिका, झैयद अहमद, नईम अन्यारी, रहिम खान, संघ व्यवस्थापक सय्यद मोहसीन यांचा समावेश होता. तीन दिवसांमध्ये १६५ सामने खेळविली गेलीत. या सीझनमध्ये १२ लाखांची पारितोषिके विजेत्यांना वितरित केले गेले. जैन इरिगेशनच्या जैन सुप्रिमोजने डेक्कन प्रीमियर लिगमध्ये उत्कृष्ठ कौशल्य आणि टीमवर्क दाखवून प्रथम स्थान मिळवले. रोष पारितोषिक व भला मोठ्या चषकाने जैन सुप्रिमोज संघाचा सन्मान करण्यात आला. विजयी संघाचे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक व जैन सुप्रिमोज संघाचे संघमालक अतुल जैन, जैन स्पोर्टस अॅकडमीचे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे खेळाडू व प्रशिक्षक यांनी कौतूक केले आहे.

डेक्कन प्रीमियर कॅरम लीग (DPCL) सीझन-३ चे पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कॅरम खेळातील अपवादात्मक प्रतिभा ओळखून डेक्कन प्रीमियर लिगचे अध्यक्ष डॉ. नीरज कुमार संपथी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस व्ही. डी. नारायण उपस्थित होते. ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस भारती नारायण, आंध्रप्रदेश राज्य कॅरम असोसिएशनचे सरचिटणीस एस. के. अब्दुल जलील यांनी स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून काम पाहिले. मान्यवरांनी उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहित केले. विजेत्यांसाठी, अव्वल खेळाडू आणि संघांना संपूर्ण लीगमध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानित केले. जैन सुप्रिमो संघाने प्रथम, द्वितीय स्ट्राइक फोर्स, नव्याभारती स्ट्रायकर्सने तिसरा क्रमांक पटकावला. चार्मी-नार चॅलेंजर्सने अव्वल चार संघांना मागे टाकत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.


 

Next Post
अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिसखी प्रकल्प

अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिसखी प्रकल्प

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add