• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिसखी प्रकल्प

महिलांना प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, सोलर, सुतारकाम, वॉटर फिल्टर दुरूस्ती इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात येणार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिसखी प्रकल्प

जळगाव, (जिमाका) : अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागाकडून युनिसेफ आणि सीवायडीए या संस्थांच्या मदतीने आदिसखी (वॉशमित्र) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रशिक्षणानंतर पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधा देखभाल-दुरूस्तीच्या माध्यमातून स्वव्यवसायांची संधी मिळणार असल्याने आदिवासी महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्टया आत्मनिर्भार होणार आहेत.

आदिसखीच्या माध्यमातून आदिवासी महिलांना प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, सोलर, सुतारकाम, वॉटर फिल्टर दुरूस्ती इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आल्याने उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. त्यातून संपूर्ण कुटुंबाला आधार मिळणार आहे. आदिवासी महिलांना यामुळे हक्काचा रोजगार मिळणार असून त्या स्वावलंबी बनणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, पेंटिंग, सोलर, सुतारकाम, वॉटर फिल्टर दुरूस्ती, रंगकाम इत्यादी देखभाल व दुरूस्ती कामे वारंवार करावी लागतात ही कामे करण्यासाठी वेळोवेळी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. अनेकदा मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने संबंधित भौतिक व्यवस्था वापरण्यास मर्यादा येतात त्या पार्श्वभूमीवर आदिसखी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.


आदिसखी प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील सुवर्णा साळुंके , सानिया तडवी, असिता बारेला, माला तडवी, योगिता पारधी , अनिता वळवी, मनिता बारेला या ७ आदिवासी महिलांचे पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

आदिसखी महिला ह्या आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थी असल्याने प्रकल्प अधिकारी यांनी सर्वांचे कौतुक केले आहे. प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते महिलांना व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या साहित्य किटचे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहूरे, राजेंद्र लवणे, कार्यालयीन अधिक्षक राकेश अहिरे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास गायकवाड, वॉश मित्र प्रकल्प व्यवस्थापक योगेश पाटील, सीवायडीए सचिव शांताराम बडगुजर, लिपिक दिपक विनंते आदी उपस्थित होते.


 

Next Post
आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच वृध्द पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया

आयुष्याचा बेरंग होण्यापूर्वीच वृध्द पेंटरवर यशस्वी शस्त्रक्रिया

ताज्या बातम्या

कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; कामावर जाताना हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ
खान्देश

कजगावमध्ये तरुणावर अज्ञातांकडून गोळीबार; कामावर जाताना हल्ल्यात गंभीर जखमी, परिसरात खळबळ

November 25, 2026
अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास
गुन्हे

अल्पवयीन मुलीस पळवले; तरुणास ३ वर्षे सश्रम कारावास

November 25, 2026
कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!
जळगाव जिल्हा

कार्तिक पौर्णिमेनिमित्त अय्यप्पा स्वामी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

November 25, 2026
ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई
क्रिडा

ट्रॅक सायकलिंगमध्ये जळगावच्या आकांक्षा म्हेत्रेची ‘दुहेरी’ रौप्यपदकाची कमाई

November 25, 2026
शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला
Uncategorized

शेतीच्या वादातून व्यापाऱ्याचा डोक्यात लोखंडी पाईप घालून खून; मृतदेह बहुळा नदीत फेकला

November 25, 2026
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी
जळगाव जिल्हा

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भागपुर उपसा सिंचन प्रकल्पाची  पाहणी

November 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add