• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मनाच्या शांततेसाठी परमेश्वराची भक्ती करा.. – भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी

श्रीमद् भागवत कथेत नंद उत्सवात भाविक झाले तल्लीन, हभप परमेश्वर महाराज उगले यांचे झाले रात्री कीर्तन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 19, 2025
in धार्मिक
0
मनाच्या शांततेसाठी परमेश्वराची भक्ती करा.. – भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी

जळगाव, (प्रतिनिधी) : शांत मनाने निर्णय घेतला तर तुमचा निर्णय कधी चूकणार नाही. मन खूप चंचल आहे. त्याला शांत करण्यासाठी परमेश्वराची निस्वार्थपणे भक्ती करा, असे प्रतिपादन बीड येथील भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी यांनी केले. येथील जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे दि. १५ ते २२ जानेवारीपर्यंत जुने जळगाव येथील बदाम गल्लीत संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दररोज रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील विविध कीर्तनकार त्यांच्या सुश्राव्यवाणीतून कीर्तन करीत आहेत. रविवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती करण्यात आली.

कथेत पाचव्या दिवशी स्वामींनी उपवास, व्रताचे महत्त्व सांगत त्यांनी बळीराजा, भगवान वामन, मस्य अवतार, श्रीराम आणि श्री कृष्णाची कथा सांगितले. भक्तासाठी ईश्वर अनेक अवतार घेत असतो. त्यामुळे परमेश्वराचे ध्यान करा. तुमच्यावर आलेल संकट तो कोणत्या ना कोणत्या रूपाने दूर करीत, असा संदेशही भागवताचार्य हरिहरानंद भारती स्वामी यांनी दिला.

यावेळी वामन अवताराचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. तसेच बाळ कृष्णाचा जन्म उत्सव यावेळी साजरा करण्यात आला. सोहळ्यात पाच सुवासिनी पाळणा गायला. नंद उत्सवासाठी सभा मंडप साजरा करण्यात आला होता. कथेला हभप आर्वीकर महाराज, सोपानदेव महाराज यांनी भेट दिली. कथेनंतर राजेश खडके, विजू चौधरी, तेजस चौधरी, स्वप्नील चौधरी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. रात्री ८ वाजता हभप परमेश्वर महाराज उगले यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी पावली खेळून सप्ताहात उत्साह आणला. भाविकांनी दररोज कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय हनुमान सांस्कृतिक मंडळ आणि जुने जळगाव बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Next Post
दुचाकी आमने सामने आदळल्याने युवकाचा मृत्यू

दुचाकी आमने सामने आदळल्याने युवकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी
जळगाव जिल्हा

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

August 12, 2026
संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी
सामाजिक

संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी

August 12, 2026
अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री
जळगाव जिल्हा

अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

August 12, 2026
सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर
जळगाव जिल्हा

सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर

August 12, 2026
रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड
जळगाव जिल्हा

रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड

August 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add