• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महावितरण कडून १४५० वीज मीटरची तपासणी ; २०३ जणांवर कारवाई

विजेची हानी रोखण्यासाठी महावितरणचा अनोखा प्रयोग

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
महावितरण कडून १४५० वीज मीटरची तपासणी ; २०३ जणांवर कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे पालकत्व असलेले कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर आणि मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांच्या निर्देशानुसार परिमंडलात विजेच्या अवैध वापराविरुध्द मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत चोपडा आणि अमळनेर उपविभागातही सातत्यपूर्वक मोहीम राबविण्यात येत आहे. मोहीमेत १४५० वीज मीटरची तपासणी करण्यात आली. त्यात २०३ सदोष मीटर धारकांवर भारतीय विद्युत कायदाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

धरणगाव विभागाअंतर्गत दि. १५ जानेवारी रोजी चोपडा आणि अमळनेर शहरात विशेष मीटर तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी अमळनेर शहरात २० पथके व चोपडा शहरात १८ पथके असे एकूण ३८ पथके तयार करण्यात आली होती. त्यासाठी एकूण १९० कर्मचारी सहभागी होते. अमळनेर शहरामध्ये एकूण ८५० मीटरची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११६ मीटरमध्ये फेरफार व छेडछाड करुन वीज चोरी झाल्याचे आढळून आल्याने कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात आली. त्याप्रमाणे चोपडा शहरात एकूण ६०१ मीटरची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २०३ ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

विजेची वितरण व वाणिज्यक हानी अधिक असणाऱ्या भागात वीज चोरीला आळा घालण्यासाठी परिमंडलात ग्राहकाच्या दारावरील वीज मीटर काढून ते रस्त्यावरील विजेच्या खांबावर बसविण्यात आलेल्या ‘मल्टी मीटर बॉक्स’मध्ये बसविण्याचेही काम सुरु आहे. ते काम जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही सुरु आहे. त्यानुसार गत सप्ताहात शहादा विभागात (नंदुरबार) ६०० तर तळोद्यात ५० मीटर घराऐवजी मल्टी मीटर बॉक्स मध्ये बसविण्यात आले आहेत. मल्टी मीटर बॉक्स म्हणजे विजेच्या खांबावर बसविण्यात आलेल्या एका मोठ्या पेठीत अनेक वीजमीटर बसविणे होय. जळगाव मंडल कार्यालय क्षेत्रामध्येही सदर मल्टी मीटर बॉक्स बसविण्याचे सूचना संबंधित विभागांना देणेत आलेल्या आहेत.

Next Post
केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’

केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’

ताज्या बातम्या

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता
जळगाव जिल्हा

मुलांनी केले आई-वडिलांचे पाद्यपूजन, व्यक्त केली कृतज्ञता

July 11, 2025
जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल
गुन्हे

जिल्ह्यात हातभट्टी दारूविरुद्ध मोठी कारवाई: १४ लाखांचा मुद्देमाल जप्त; १३४ गुन्हे दाखल

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group