• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शहापूरजवळ झालेल्या अपघातात अमळनेरच्या दाम्पत्यासह चोपड्याचा एक ठार

ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
शहापूरजवळ झालेल्या अपघातात अमळनेरच्या दाम्पत्यासह चोपड्याचा एक ठार

जळगाव, (प्रतिनिधी) : मुंबई-नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ५ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांच्या अपघातामध्ये जळगाव जिल्ह्यातील दाम्पत्यासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले आहेत. अपघाताप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मुंबईकडून नाशिककडे जाणारा टेम्पो लेनमध्ये घुसला. त्याच वेळी नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या गणेश ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला एका कंटेनरने दिलेल्या जबर धडकेत बस पलटी झाली. यात अमळनेर तालुक्यातील दाम्पत्य व चोपडा येथील एक प्रवासी असे ३ जण मृत्यूमुखी पडले आहे. तर १४ जण जखमी झाल्याची घटना घडली. महामार्गावर भीषण अपघात झाल्याचं समजताच ग्रामस्थ्यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ठाणे येथे पाठवण्यात आले आहे.

मृतांमध्ये अमळनेर तालुक्यातील मारवड येथील पियुष पाटील (वय ३५) आणि त्यांच्या पत्नी वृंदा पियुष पाटील (वय ३२) यांचा समावेश आहे. तर त्यांची अडीच वर्षीय मुलगी हि गंभीर जखमी आहे. पियुष व वृंदा हे मकर संक्रांतीनिमित्त घरी आले होते व रात्री खाजगी ट्रॅव्हल्सने मुंबईकडे परत निघाले होते. पियुष मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होता, तर वृंदा या माहेर असलेल्या बोरगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या. तसेच या अपघातात जखमींमध्ये चोपडा येथील एकाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

जखमींमध्ये अदान खान (वय २८, रा. धुळे), समीना सय्यद (वय ३५, रा. कल्याण), माया कटरे (वय ५५, रा. कल्याण ), साई सागर यदिंगे (वय ३, रा. कल्याण), महेंद्र यदिंगे (वय ५२, रा. कल्याण), परि सागर यदिंगे (वय ५, रा. कल्याण), रेहमान इमदादूर (वय ३२, रा. आसाम), शिफा सय्यद( वय ३४, रा. कल्याण) सैय्यद शरिक (वय ३८, रा. कल्याण), अरुणाबाई पाटील (वय ४०, रा. कल्याण ), देविदास बैसाने(वय ५२, रा. अमळनेर), अनिल गुप्ता (वय ३२, रा. नागपूर), किशोर कुमार पाटील (वय ५० , रा. अमळनेर), मुकेश बैसाणे (वय ४५, रा. चोपडा), ज्ञानेश्वर वानखेडे(वय ४७, रा. बोरशेटी), जय लक्ष्मी शेट्टी (वय २०, कांदिवली) यांचा समावेश आहे.


Tags: accident
Next Post
बॉलीवूड अभिनेत्यावर चोराने केले चाकूचे वार

बॉलीवूड अभिनेत्यावर चोराने केले चाकूचे वार

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलाचा विवस्त्र व्हिडीओ व्हायरल; दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
गुन्हे

अल्पवयीन मुलाचा विवस्त्र व्हिडीओ व्हायरल; दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

July 13, 2025
प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group