• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दुभंगलेले ओठ, चेहऱ्याच्या व्यंगावर शासकीय वैद्यकीयात महाविद्यालय मोफत शस्त्रक्रिया

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 14, 2025
in आरोग्य, जळगाव जिल्हा
0
दुभंगलेले ओठ, चेहऱ्याच्या व्यंगावर शासकीय वैद्यकीयात महाविद्यालय मोफत शस्त्रक्रिया

रुग्णसेवेसाठी वैद्यकीय पथकाने कार्यरत राहिले पाहिजे : डॉ. लॅरी विंस्टेन

जळगाव, (प्रतिनिधी) : एखाद्या व्यक्तीला जन्मजात व्यंग असणं आणि ते व्यंग वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीने सेवाभावी पद्धतीने दूर करण्यासाठी प्रयत्न करणे ही खूप मोठी रुग्णसेवा आहे. त्यासाठी वैद्यकीय पथकाने कायम कार्यरत राहिले पाहिजे असे प्रतिपादन अमेरिका येथील प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी विंस्टेन यांनी केले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ३ दिवसीय दुभंगलेले ओठ व चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी याविषयी मोफत शस्त्रक्रिया शिबिर दि. १४ ते १६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटनावेळी अमेरिका येथील सर्जन डॉ. लॅरी विन्सटेन बोलत होते. महाविद्यालयातील कान नाक घसा, शल्य चिकित्सा आणि बधिरिकरण शास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने हे शिबिर पार पडत आहे.

उद्घाटनावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अशोक जैन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सदस्य डॉ. अशोक श्रीश्रीमाळ, जिल्हाध्यक्ष अजय राखेचा, सचिव अजय लोढा, विश्वस्त प्रमोद साबद्रा मंचावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी शिबिराचे उद्घाटन केले. यानंतर डॉ. गिरीश ठाकुर आणि डॉ. लॅरी विन्स्टेन यांनी आपल्या मनोगत आतून शिबिराविषयी आढावा घेत गरजूंसाठी अशा शिबिराची गरज असल्याचे सांगितले.

यानंतर ओपीडीत दुभंगलेले ओठ, कापले गेलेले कान-नाक, चेहऱ्याचे व्यंग असलेल्या लहान बालकांचे, तरुण, जेष्ठ नागरिकांची तपासणी डॉ. विन्स्टेन यांनी केली. त्यातून आज मंगळवारी ७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच, आज दि. १५ व १६ जानेवारी रोजी उर्वरित रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, कान नाक घसा विभागाचे विभागप्रमुख डॉ. अक्षय सरोदे, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अमित हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील डॉक्टर, कनिष्ठ निवासी, इंटर्न, कर्मचारी यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी सहकार्य केले.

Next Post
डॉक्टरांचे बंद घर फोडून ७३ हजारांचा मुद्देमाल लंपास ; जळगावातील घटना

डॉक्टरांचे बंद घर फोडून ७३ हजारांचा मुद्देमाल लंपास ; जळगावातील घटना

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add