• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पाळधी गावात कलम १६३ लागू ; उपविभागीय दंडाधिकारींनी दिले आदेश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 1, 2025
in गुन्हे
0
पाळधी गावात कलम १६३ लागू ; उपविभागीय दंडाधिकारींनी दिले आदेश

जळगाव, (जिमाका वृत्त) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे ३१ डिसेंबर रोजी रात्री १०.०० वाजेच्या सुमारास किरकोळ वाद झाला. या वादातून पाळधी गावात काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आल्याच्या घटना घडल्या. मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळानंतर पुन्हा काही भागांमध्ये जाळपोळ करण्यात आल्याने पाळधी व लगतच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजीवन सुरळीत राहावे यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३ चे कलम १६३ चे आदेश लागू करण्यात आला आहे.

एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करुन पाळधी या संपूर्ण गावाचे हद्दीत दिनांक ०१/०१/२०२५ रोजी सकाळी ०३.३० वाजेपासून ते दिनांक ०२/०१/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वाजेपावेतो भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ चे आदेश लागू करीत असल्याचा आदेश दिला आहे.

या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती / संस्था / संघटना यांच्या विरुध्द प्रचलित कायद्यात नमूद केल्यानुसार कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा उदा. रूग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अंत्यविधी व शासकीय कर्मचारी यांना लागू राहणार नाही. असे निवृत्ती गायकवाड यांनी दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.


 

Next Post
नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती ; गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘ब्लिस वॉक’

नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती ; गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे 'ब्लिस वॉक'

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add