जळगाव, (जिमाका) : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अदययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुकांती पोर्टल हे ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. आता या पोर्टलवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करावयाची आहे.
मधुक्रांती पोर्टल वरील नोंदणीमुळे मधुमक्षिका पालकांना नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळणार आहे. नोंदणी धारकांना १ लाखापर्यंत फ्री विमा उपलब्ध होतो. विना अडथळा मधुमक्षिका पेटयांच्या स्थलांतराचा लाभ मिळणार आहे.
या ऑनलाइन पोर्टल नोंदणीसाठी madhukranti.in/nbb या वेबसाईटवर आधार कार्ड (नाव, जन्मतारीख, पत्तासहित), अदययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला), मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार-२०० kb पर्यंत), मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-१०० kbपर्यंत) हे कागदपत्रे आवश्यक असणार आहे. या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी शुल्क भरता येणार आहे.
या पोर्टलवर स्व मालकीच्या मधुमक्षिता पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या १० ते १०० असल्यास २५० रुपये, १०१ ते २५० असल्यास ५०० रुपये, २५१ ते ५०० असल्यास ५०१ ते १००० असल्यास २००० रुपये, १००१ ते २००० असल्यास १०००० रुपये, २००१ ते ५००० असल्यास २५००० रुपये, ५००१ ते १०००० असल्यास १००००० आणि १०००० पेक्षा अधिक असल्यास २००००० रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त मधुमक्षिकापालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रीय मधमाशी मंडळातर्फे करण्यात आले आहे.