• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची धाड !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 22, 2024
in गुन्हे
0
हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांची धाड !

बांगलादेशी तरुणीसह पाच जण ताब्यात

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ असलेल्या २ हॉटेलमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, एका बांगलादेशी तरुणीला देखील पोलिसांनी अटक केली असून ती बेकायदा वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ हॉटेल चित्रकूटमध्ये कुंटनखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच पथक रवाना केले. पंच आणि नकली ग्राहकाच्या मदतीने पथकाने पडताळणी केली. कारवाईत जवळच असलेल्या हॉटेल यशमध्ये देखील एक महिला आढळून आली.

पोलीस पथकाने हॉटेल चित्रकूटमध्ये एक डमी ग्राहक पाठविला व त्यास काही आढळल्यास मिस कॉल देण्यास सांगितले. त्यानुसार डमी ग्राहकाने मिस कॉल दिला व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि गणेश वाघ, उपविभागीय कार्यालयाचे पोहेकॉ विकास महाजन, सुहास पाटील, पोकॉ गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील, सोनाली चव्हाण गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर या पथकाने तेथे छापा टाकला असता काउंटरवर नीलेश गुजर व चेतन माळी आढळले. त्यांची अंगझडती घेतली असता १५०० रुपये आणि मोबाईल आढळला.

पोलिसांनी हॉटेल चित्रकूटमध्ये आढलेल्या महिलेची चौकशी केली असता हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय सखाराम तायडे याच्यामार्फत ती येथे आल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तसेच तिच्या सोबत असलेली दुसरी महिला हॉटेल यशमध्ये असल्याचे सांगितले. तेथून व्यवस्थापक विजय तायडे याच्यासह एका तरुणीला ताब्यात घेतले. ती तरुणी बांगलादेशी असल्याचे आढळून आले. बांगलादेशी तरुणीकडे कोणतेही दस्ताऐवज आढळून आले नाही.

हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय तायडे याच्याशी बांगलादेशी तरुणीचा संपर्क झाला व देहव्यापारातून तिला पैसे दिले जाणार असल्याचे सांगून तिला येथे आणले असल्याची माहिती सदर तरुणीने पोलिसांना दिली. तिच्याजवळ एक मोबाईलही आढळून आला. याप्रकरणी पोकॉ गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नीलेश गुजर, चेतन माळी, विजय तायडे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बांगलादेशी तरुणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Next Post
सावदा अपघातातील मृतांची संख्या पोहचली चार वर

सावदा अपघातातील मृतांची संख्या पोहचली चार वर

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group