जळगाव, (प्रतिनिधी) : येथील गंधार कला मंडळातर्फे स्व.राजाराम देशमुख स्वरगंधार करंडक मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धेचे आयोजन रविवार दि.२९ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा बळीराम पेठेतील ब्राह्मण सभा याठिकाणी होणार आहे.
सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या या स्पर्धेत लहान गट वय वर्षे ९ ते १४ इयत्ता चौथी ते नववीपर्यंत, तर पुढील गट खुला असेल. या स्पर्धेत मराठी चित्रपटातील भावगीत, भक्तिगीत, गझल, भजन, अभंग, लावणी असा कोणताही गीत प्रकार गाता येईल.
दोन्ही गटातील विजेत्यांना रोख रक्कम स्व.शरद नागराज यांच्या स्मरणार्थ तसेच दोन्ही गटातील प्रथम क्रमांकास स्व.राजाराम देशमुख स्वरगंधार करंडक देण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना भेट वस्तू देण्यात येईल. लहान गटासाठी तबलापेटी संगत असेल, तर मोठा गट फक्त कराओके वर गीत सादर करू शकेल.
स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी दि.२६ डिसेंबर पर्यंत मुदत असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा विशाखा देशमुख (मो.क्र-९३२५३५३१९८) यांनी केलं आहे.