• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सैन्यदलातील शहिदांच्या कुटुंबियांना ५ महिन्यात भूखंड वाटप करणार

मेहरूणला लवकरच स्मारक, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 12, 2024
in जळगाव जिल्हा
0
सैन्यदलातील शहिदांच्या कुटुंबियांना ५ महिन्यात भूखंड वाटप करणार

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील माजी सैनिकांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी विशेष लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता. त्यात शहीद जवानांच्या कुटुंबियांना पुढील ५ महिन्यात भूखंड वाटप करण्यात येतील. तसेच मेहरूण भागात सैनिकांचे स्मारक उभे केले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या ध्वज निधी संकलन कार्यक्रममध्ये ते बोलत होते.

यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकारी वेवोतोलू केजो, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश पाटील, सहायक सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, माजी सैनिक ईश्वर मोरे उपस्थित होते. तालुक्यातील सावखेडा येथे २ हेक्टर भूखंड डिफेन्स कॉलनीसाठी देण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरु आहे. यासाठी पात्र सैनिकांना इथे घर मिळेल. जवळपास दोनशे सैनिकांना इथे जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली.

पाचोरा आणि भडगाव येथील खुप जवान देशसेवेत आहेत, त्यांच्यासाठी पण काही करता येईल यासाठी प्रयत्न करू असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याबरोबरच डिफेन्स स्कुल काढण्याची गरज असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जे सहकार्य शक्य आहे ते दिले जाईल असे सांगून माजी सैनिकांनी एकत्र येऊन नोकरी करण्यापेक्षा त्यांना मिळणाऱ्या भूखंडावर प्रक्रिया उद्योग सुरु करावेत. जिल्हा प्रशासन त्यासाठी मदतीला असेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली. सैनिक कल्याणासाठी जो ध्वज निधी संकलन केलं जातं ते प्रत्येकवर्षी जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक होतं. २०२३ साठी १ कोटी १८ लाख होते. संकलन झालेली रक्कम १ कोटी २३ लाख आहे.

या रक्कमेपेक्षा किती तरी अधिक रक्कम पुढच्या उद्दिष्टासाठी देता येईल. देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक जण पुढे येऊ शकतात. त्यासाठी महानगरपालिका, पालिका, सेवा केंद्र याठिकाणी ध्वज निधी संकलन कॅशलेस ठेवावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. याप्रसंगी सैनिकांच्या पाल्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात प्रविण्य मिळाल्याबद्दल बक्षीसाचे धनादेश देऊन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी सर्वाधिक निधी संकलन करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश पाटील यांनी केले. त्यात त्यांनी जिल्हा सौनिक कल्याण विभागामार्फत केलेल्या कामाची सविस्तर माहिती सांगितली.

Next Post
अट्टल चोरट्यास अटक ; मुक्ताईनगर पोलीसांची कामगिरी

अट्टल चोरट्यास अटक ; मुक्ताईनगर पोलीसांची कामगिरी

ताज्या बातम्या

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!
खान्देश

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

January 18, 2026
जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी
खान्देश

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

January 18, 2026
“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group