• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डंपरने दुचाकीस्वाराला उडविले ; तरुण ठार

जळगावच्या आरएल चौफुलीवरील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 12, 2024
in जळगाव जिल्हा
0
डंपरने दुचाकीस्वाराला उडविले ; तरुण ठार

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या आरएल चौफुली येथे एका भरधाव डंपरने पुढे जाणाऱ्या दुचाकीला उडवल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसिफ हाजी शौकत कुरेशी (वय ४० रा. आशा नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले आणि १ मुलगा असा परिवार आहे. उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले आसिफ कुरेशी पत्नी व चार मुलांसह जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील आशानगर येथे वास्तव्याला होते. वॉल फिटिंगचे काम करून ते उदरनिर्वाह करत होते. बुधवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी ते गावात दुचाकीने गेलेले होते. जळगाव शहरातील काम आटपून ते दुपारी ३ वाजता घरी जाण्यासाठी निघाले होते.

त्यावेळी एमआयडीसीतील आर. एल. चौफुली येथून जात असताना त्याच्या मागून येणारे डम्परने जोरदार धडक दिली. आसिफ कुरेशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रवाना करण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Next Post
पाचपट रक्कम करून देण्याचे अमिष दाखवीत व्यापाऱ्याला ४८ लाखात गंडविले

पाचपट रक्कम करून देण्याचे अमिष दाखवीत व्यापाऱ्याला ४८ लाखात गंडविले

ताज्या बातम्या

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 8, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add