• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला आमदारांच्या हस्ते ५ लाखांची मदत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 11, 2024
in जळगाव जिल्हा
0
मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला आमदारांच्या हस्ते ५ लाखांची मदत

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाच्या माध्यमातून मिळाला गरजू कुटुंबियांना आधार

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : ऊसतोडणी कामाच्या निमित्ताने मराठवाड्यातील धाराशिव येथील साखर कारखान्यावर काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे तांडा येथील कांतीलाल देविदास राठोड यांच्या वारसांना आ. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते ५ लाखांच्या मदतीचा धनादेश आज बुधवारी सुपूर्द करण्यात आला.

यावेळी माजी जि.प. सभापती राजेंद्र राठोड, माजी पंचायत समिती सभापती विजय जाधव, माजी कृउबा सभापती कपिल पाटील, संजय गांधी समिती सदस्य दिनकर राठोड, जेष्ठ नेत्या नमोताई राठोड, राम पाटील आदी उपस्थित होते.

महायुती सरकारच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन झाल्याने ऊसतोड कामगारांना सुरक्षा कवच प्राप्त झाले असून या महामंडळाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील कै. कांतीलाल राठोड ऊसतोड कामगाराच्या वारसांना याचा लाभ मिळाला आहे.

वरखेडे तांडा येथील कांतीलाल देविदास राठोड हे ऊसतोडणी कामानिमित्त बाणगंगा सहकारी साखर कारखाना जवळा ता.भूम जि. धाराशिव येथे गेले असता तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक ६ फेब्रुवारी रोजी घडली होती. मयत कांतीलाल राठोड यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांना आधार देणे गरजेचे होते.

याबाबत समाजकल्याण विभागाने आवश्यक तो प्रस्ताव तयार करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवला असता त्याला मंजुरी मिळाली व कै. कांतीलाल राठोड यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असता आज बुधवारी ती आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वितरीत करण्यात आली.

Next Post
डंपरने दुचाकीस्वाराला उडविले ; तरुण ठार

डंपरने दुचाकीस्वाराला उडविले ; तरुण ठार

ताज्या बातम्या

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 8, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add