• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जुनी पाईपलाईन चोरी प्रकरणी सुनील महाजन यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 4, 2024
in गुन्हे
0
जुनी पाईपलाईन चोरी प्रकरणी सुनील महाजन यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : गिरणा पंपिंग येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाइप जेसीबीद्वारे काढून नेताना दोन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. हा धक्कादायक प्रकार २ डिसेंबर रोजी गिरणा पंपिंग रस्त्यावर भरदिवसा सुरू होता. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात महानगरपालिकेच्या एका माजी विरोधी पक्षनेत्याचे नाव समोर येत आहे.

गिरणा पंपिंग प्लांटवरून पुर्वी शहराला पाणीपुरवठा केला जात होता. सध्या ही योजना बंद आहे. गिरणा पंपिंग रस्त्यावर जेसीबीद्वारे चारी खोदून बीडाचे पाइप काढण्यात येत असल्याची माहिती मनपा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांना मिळाली. बोरोले यांनी पालिकेचे कर्मचारी पाठवून दोन जणांना रंगेहात पकडले.

दरम्यान नरेंद्र निवृत्ती पानगळे (३०) व रवण चव्हाण (दोघे रा. शिरसोली, ता. जळगाव) हे दोन जेसीबीच्या (क्र. एमएच. ३२, पी. ३८५५) साहाय्याने जुनी पाइपलाइन खोदून बीड धातूचे पाइप काढत असल्याचे आढळले. कोणतीही परवानगी नसताना पाइप काढण्याची हिंमत केली.

पाइप काढणाऱ्यांची चौकशी करीत असताना चव्हाण याने तेथून पळ काढला. त्या ठिकाणी अक्षय अग्रवाल नामक व्यक्ती पोहोचला. ही पाइपलाइन अक्षय अग्रवाल, भावेश पाटील व अमिन राठोड यांच्या सांगण्यावरून खोदली असल्याची माहिती जेसीबी मालक व चालक पानगळे याने दिली.

चोरीच्या उद्देशाने काढलेले दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे सहा बीडाचे पाइप व दोन लाख ५० हजार रुपये किमतीचा जेसीबी तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी योगेश बोरोले यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नरेंद्र पानगळे, रवण चव्हाण, अक्षय अग्रवाल, भावेश पाटील, अमिन राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

नरेंद्र पानगळे याचा पाय फॅक्चर असल्याने त्याला नोटीस दिली तर उर्वरित चार जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्या. एम.एम. बडे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली. गिरणा पंपिंग योजनेचे जुने पाईप काढून चोरून नेल्याप्रकरणी या पूर्वीदेखील रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार जणांमधील अक्षय अग्रवाल हा महापालिकेच्या भंगार साहित्य व इतर कामांचा ठेका घेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेल्यांच्या जबाबामध्ये सुनील महाजन हे नाव समोर आले. न्यायालयात रिमांड रिपोर्ट सादर करताना सुनील वामन महाजन (रा. मेहरुण, जळगाव) असे नाव टाकण्यात आले आहे. मात्र जबाबात सुनील सुपडू महाजन असे नाव असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सुनील महाजन फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.


 

Next Post
पोलीस ठाण्यातील बेवारस वाहने घेऊन जा, अन्यथा..?

पोलीस ठाण्यातील बेवारस वाहने घेऊन जा, अन्यथा..?

ताज्या बातम्या

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add