जळगाव, (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर चौक मेहरूण येथे २१ ते २८ नोव्हेंबर दरम्यान ‘श्री ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सालाबादा प्रमाणे या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक प्रशांत नाईक केले आहे. दरम्यान अखंड हरिनाम कीर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्या मध्ये सातव्या दिवशी दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी दीपोत्सवाचे पूजन माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सपत्नीक केले.
या सोहळ्यात सर्व कीर्तनकार यांनी समाज प्रबोधन करून कीर्तनात सर्व भाविकांनी मनसोक्त कीर्तनाचा आनंद लुटला. २८ तारखेला सप्ताह सांगते च्या पालखी सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभाग नोंदवीला. व सर्वांनी श्री संत ज्ञानेश्वर चौक मेहरूण येथे महाप्रसादाचा लाभ घेतला. अशी माहिती माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दिली आहे.