• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गावागावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट

१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोअर-टू-डोअर जयघोष

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 10, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
गावागावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट

जळगाव /धरणगाव (प्रतिनिधी) : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांचा प्रचार धूमधडाक्यात चालू असून, ते स्वतः महायुतीच्या शिलेदारांसह अवघ्या १२ दिवसांत तब्बल १२१ गावांमध्ये भगव्या वादळाची तुफान लाट पोहचली असून प्रचारा दरम्यान एकेका गावात शिवसेनेच्या भगव्या झेंड्याचा झंकार, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गावागावात उमटलेली “धनुष्यबाण” ची गर्जना यामुळे मतदार संघात जिकडे तिकडे भगवामय वातावरण आहे.

महिला कार्यकर्त्यांचा उत्साह तर विशेष लक्षणीय आहे. गुलाबभाऊंच्या स्वागतासाठी महिलांनी औक्षणाचा थाट उभा केला आहे, त्यांच्या मनात भाऊंच्या प्रती असलेल्या आदराचं आणि आपुलकीचं स्थान दिसून येत होत. ज्येष्ठांचे, संत-महंतांचे आशीर्वाद, आणि प्रत्येक घरातून मिळणारी सामान्य जनतेची दुवा हा प्रचारातला भावनिक साद दिसली.

गुलाबभाऊंच्या नावाने गावा – गावात स्वागताची लाट उसळली असून कार्यकर्त्यांनी जबरदस्त प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक गल्लीबोळात फडकणारा भगवा आणि जोशात घुमणाऱ्या घोषणा गुलाब भाऊंच्या जनाधाराचं प्रतिक बनले आहे. शिवसेनेच्या स्टाईलमध्ये प्रचाराचा हक्काचा झेंडा फडकवून, भाऊंच्या नावाच्या घोषणा हर एक गल्लीबोळात घुमत आहेत. लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आणि भगव्या लाटेने मोठ्या फरकाने गुलाब भाऊंच्या विजयाचा मार्ग आता अधिकच खंबीर व सुकर झाला आहे.

प्रतापराव व विक्की बाबा यांचा डोअर- टू – डोअर गाठी भेटी..
सर्वसामान्याच्या हृदयात कोरलेले गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ शेकडो तरुणांच्या सोबतीने त्यांचे दोन पुत्र जि. प. सदस्य प्रतापराव पाटील आणि लघु उद्योजक विक्की बाबा या दोन्ही भावंडांनी पायाला भिंगरी लावून जळगाव व धरणगाव तालुक्यातील धरणगाव शहरासह डोअर-टू-डोअर गाठी भेटी घेत ६३ गावं पिंजून काढली. विकास कामांसाठी आपले आशीर्वाद व खंबीर साथ देण्याचे आवाहन करत आहेत. प्रचार रॅलीत युवकांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

Tags: #political
Next Post
आम्हाला फक्त राजूमामाच आमदार पाहिजे ; ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया

आम्हाला फक्त राजूमामाच आमदार पाहिजे ; ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

July 28, 2025
लाडवंजारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आणि वैशाली वराडे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आणि वैशाली वराडे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार

July 28, 2025
रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान

July 27, 2025
जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर
गुन्हे

जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर

July 27, 2025
जळगावात गणेशोत्सवासाठी लगबग: सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची पहिली नियोजन बैठक संपन्न
जळगाव जिल्हा

जळगावात गणेशोत्सवासाठी लगबग: सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची पहिली नियोजन बैठक संपन्न

July 27, 2025
फरारी रोड रॉबरीचा आरोपी अखेर जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
गुन्हे

फरारी रोड रॉबरीचा आरोपी अखेर जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

July 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group