• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राजूभाऊ, आता माह्या घरी येशीन तर लाल दिव्याच्या गाडीतच येजा.. भगिनीच्या अपेक्षा

आ.राजूमामा भोळे भारावले, अयोध्या नगर भागात भरभरून प्रतिसाद

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 9, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
राजूभाऊ, आता माह्या घरी येशीन तर लाल दिव्याच्या गाडीतच येजा.. भगिनीच्या अपेक्षा

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी शनिवारी दि. ९ रोजी सकाळी अयोध्या नगर परिसर, अशोक नगर, विद्यानगर, रामचंद्र नगर भागात नागरिकांशी संवाद साधून विजयासाठी शुभाशीर्वाद घेतले. एका वृद्ध महिलेने, “राजूभाऊ, आता माह्या घरी येशीन तर लाल दिव्याच्या गाडीतच येजो रे भौ…” म्हणत शुभाशीर्वाद दिले. या महिला भगिनीच्या प्रेमामुळे आ. राजूमामा भोळे भारावून गेले.

आ. राजूमामा भोळे यांनी शनिवारी अयोध्या नगर येथील मनुमाता मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात केली. तेथून हॅपी होम कॉलनी, सोपानदेव नगर, रामचंद्र नगर, महादेव मंदिर परिसर, अशोक नगर, गीताई नगर, साईबाबा मंदिर परिसर, सिद्धिविनायक विद्यालय परिसर मार्गे रामचंद्र नगरातील हनुमान नगरात प्रचाराचा समारोप केला. परिसरातील श्री विश्वकर्मा मंदिरात महिला भगिनींनी, स्वागतम मामा…सुस्वागतम मामा… गीताने स्वागत करून औक्षण केले. भगवान श्री विश्वकर्माचे आ. भोळे यांनी दर्शन घेतले.

यानंतर विशाल कोल्हे, सुनील सरोदे, प्रदीप रोटे, विजय वानखेडे, शालिक चौधरी आदींच्या घरी सदिच्छा भेट देऊन आशीर्वाद घेतले. खा. स्मिता वाघ यांनी प्रचारात उपस्थिती देऊन महिला भगिनी व नागरिकांना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी रिपाई व महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचे नागरिकांना आवाहन केले.

रॅलीमध्ये खा. स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी उपमहापौर सुनील खडके, माजी नगरसेवक डॉ. वीरेन खडके, रंजना वानखेडे, विजय वानखेडे, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, कैलास सोनवणे, दीप्ती चिरमाडे, निशा पवार, संतोष इंगळे, किसन मराठे, बंटी भारंबे, ललित भोळे, सचिन भोळे, प्रकाश पाटील, आकाश भोळे, प्रकाश चौधरी, प्रदीप रोटे, पी. टी. दुसाने, वासुदेव भंगाळे, ॲड. दीपकराज खडके, सोहन खडके, कुणाल खडके, निळकंठ खडके, मंजुळा मराठे, सीमा वाणी, मंगला खडसे, मनीषा रोटे, भावना लोखंडे, योगेश डोळे, योगेश निंबाळकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, ज्योती चव्हाण, कुंदन काळे, हर्षल मावळे, शंतनु नारखेडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विनोद देशमुख, अर्चना कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, संजय सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tags: #political
Next Post
मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या पाच वर्षात अवैध धंद्यांचा सुळसुळाट.. – रोहिणी खडसे

मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या पाच वर्षात अवैध धंद्यांचा सुळसुळाट.. - रोहिणी खडसे

ताज्या बातम्या

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स
क्रिडा

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

July 28, 2025
‘एक वृक्ष आईच्या नावे’ उपक्रमाचा शुभारंभ ; ५००० वृक्षांचे रोपण
जळगाव जिल्हा

‘एक वृक्ष आईच्या नावे’ उपक्रमाचा शुभारंभ ; ५००० वृक्षांचे रोपण

July 28, 2025
खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

July 28, 2025
लाडवंजारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आणि वैशाली वराडे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार
जळगाव जिल्हा

लाडवंजारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव आणि वैशाली वराडे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार

July 28, 2025
रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान
जळगाव जिल्हा

रामराव तायडे यांना ‘राष्ट्रीय कामगार भूषण’ पुरस्कार प्रदान

July 27, 2025
जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर
गुन्हे

जुन्या वैमनस्यातून दोन तरुणांमध्ये सशस्त्र संघर्ष; एकाचा मृत्यू, एक गंभीर

July 27, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group