• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘अब की बार, राजूमामाच आमदार’ रांगोळीतून भगिनींनी दिल्या आ. राजूमामा भोळे यांना विजयासाठी शुभेच्छा

पिंप्राळा भागातील नागरिकांकडून ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 7, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
‘अब की बार, राजूमामाच आमदार’ रांगोळीतून भगिनींनी दिल्या आ. राजूमामा भोळे यांना विजयासाठी शुभेच्छा

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील जळगाव शहर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी सकाळी पिंप्राळ्यातील काही भागात प्रचार केला. बारीवाडा परिसरातील “अब की बार, राजू मामाच आमदार” या शीर्षकाखाली काढलेल्या रांगोळीतून एका भगिनीने दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा पाहून आ. राजूमामा भोळे भारावून गेले. तर प्रचारामध्ये ‘प्रति मकरंद अनासपुरे’ खान्देशी कलावंत बाळू इंगळे यांनी प्रचारात सहभाग घेऊन मतदारांना आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241107-WA0028.mp4

पिंप्राळा भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून व पुष्पहार अर्पण करीत आ. राजूमामा भोळे यांनी प्रचाराला सुरुवात केली. गर्जना चौक, बारीवाडा परिसर, कोळीवाडा परिसर, संत मीराबाई नगर, गणपती नगर, प्रल्हाद नगर, आनंद मंगल सोसायटी, इंद्रदेव नगर, निसर्ग कॉलनी परिसर, साई मंदिर परिसर, नामदेव नगर परिसरातून हुडको परिसरात रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये ज्युनियर मकरंद अनासपुरे असलेले खान्देशी कलावंत बाळू इंगळे यांनी सहभागी होत जनतेकडे आ. राजूमामा भोळे यांच्यासाठी आशीर्वाद मागितले.

बारीवाडा परिसरामध्ये माधुरी हितेश बारी या भगिनीने “अब की बार, राजू मामाच आमदार” या शीर्षकाखाली काढलेली आकर्षक रांगोळी लक्ष वेधून घेत होती. अनेक महिला भगिनींनी आ. भोळे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी सदिच्छा दिल्या. संत मीराबाई नगर येथे राधाकृष्ण मंदिर, हनुमान मंदिर आणि महादेव मंदिरात दर्शन घेऊन विजयासाठी आ. भोळे यांनी साकडे घातले. तसेच माजी नगरसेवक शोभाताई बारी यांच्या घरी भेट देऊन शुभाशीर्वाद घेतले.

प्रचार रॅलीमध्ये भाजपाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी नगरसेवक शोभाताई बारी, सुरेश सोनवणे, मंडळ क्रमांक ५ चे अध्यक्ष शक्ति महाजन, विजय पाटील, अतुल बारी, शुभांगी बिहाडे, नीतू परदेशी, चंद्रकांत कोळी, उमेश सूर्यवंशी, योगेश गोसावी, महेंद्र केळकर, किरण भोई, डॉ. जयश्री बारी, माजी नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, कैलास सोनवणे, शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक ज्योती चव्हाण, कुंदन काळे, उमेश सोनवणे, आशुतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हा नियोजन समिती सदस्य योगेश देसले, विनोद देशमुख, सुनिता शिंदे, योगेश पाटील, लता मोरे, पी.एस. पाटील, साजिद पठाण, रिपाई (आठवले) गटाचे पदाधिकारी मिलिंद अडकमोल, मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #jalgaon_city#political
Next Post
विरोधकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागेल.. – आ.किशोर पाटील

विरोधकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागेल.. - आ.किशोर पाटील

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add