• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात

रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी घेतली आघाडी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 5, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ आज मंगळवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी जुन्या जळगावात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आला. प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. भोळे यांनी प्रचाराची सुरुवात केली. यानंतर जुने जळगाव परिसरातील विविध भागांमध्ये जाऊन आ. राजूमामा भोळे यांची प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये जनतेमधून भरभरून प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी औक्षण करून तसेच पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

जुने जळगाव परिसरातील विविध कॉलनीमध्ये महिला भगिनींनी आ.राजूमामा भोळे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक भागात आ. भोळे यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून येत होता. प्रचार रॅलीत ‘कहो दिल से, राजूमामा फिर से’, एक, दोन, तीन, चार… राजूमामाच होणार आमदार’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

रॅलीत खा. स्मिता वाघ, माजी महापौर सीमाताई भोळे यांचेदेखील महिला भगिनींनी औक्षण केले. गोपाळपुरा परिसरातील भोलेनाथ मंदिरामध्ये आ.राजूमामा भोळे यांनी पूजन करून आशीर्वाद घेतले. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे शुभाशीर्वाद घेऊन आ. राजूमामा भोळे यांनी प्रचार रॅलीमध्ये पहिल्याच दिवशी आघाडी घेतली.

रॅलीमध्ये भाजपाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, विधानसभा प्रमुख विशाल त्रिपाठी, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, शिवसेना शिंदे गटाचे महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी, माजी महापौर ललित कोल्हे, महानगर प्रमुख संतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लल्लन सपकाळे, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, आनंदा सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते.

रॅलीमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदराव मेटकर, भागवत भंगाळे, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, मंडळ क्रमांक ३ चे अध्यक्ष सुनील सरोदे, माजी उपमहापौर सुनील खडके, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, माजी नगरसेवक अजित राणे, मनोज काळे, डॉ.वीरेन खडके, डॉ. वैभव पाटील, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भारतीताई सोनवणे, गायत्री राणे, सरिता नेरकर, जितेंद्र मराठे, भगत बालाणि, राजेंद्र घुगे पाटील, प्रवीण कोल्हे, मुकुंदा सोनवणे, दीपमाला काळे, मनोज काळे, बंटी खडके, जयेश भावसार, ललित चौधरी, आशिष सपकाळे, राहुल वाघ, चित्रा मालपाणी, दीप्ती चिरमाडे, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख राधेश्याम कोगटा, पियुष कोल्हे, माजी नगरसेवक ज्योती चव्हाण, गणेश सोनवणे, कुंदन काळे, महिला आघाडीचे शोभाताई चौधरी, आरपीआय आठवले गटाचे राजू मोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

VIDEO :


 

Tags: #political
Next Post
विकास कामांच्या जोरावर किशोरआप्पा विजय साकारणार.. – खा. स्मिताताई वाघ

विकास कामांच्या जोरावर किशोरआप्पा विजय साकारणार.. - खा. स्मिताताई वाघ

ताज्या बातम्या

महापौरांच्या पाहणीत वॉर्ड ११ मधील समस्यांचा पाढा
खान्देश

महापौरांच्या पाहणीत वॉर्ड ११ मधील समस्यांचा पाढा

October 28, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

भडगावच्या तहसीलदार दुचाकी अपघातात जखमी; अवैध वाळू उपसा कारवाई दरम्यान घडली घटना

October 28, 2026
पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू

October 28, 2026
मेहरुणमधील जागेची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर नोंदणी
Uncategorized

मेहरुणमधील जागेची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर नोंदणी

October 28, 2026
कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक
गुन्हे

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक

October 28, 2026
किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी
गुन्हे

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add