• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गुलाबभाऊंचे तांड्यावर बंजारा गीताने केले स्वागत !

'गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर'.. बंजारा तांडा वासियांचा निर्धार !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 5, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
गुलाबभाऊंचे तांड्यावर बंजारा गीताने केले स्वागत !

जळगाव, (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून गुलाबराव पाटील यांनी तांड्यांच्या विकासावर दिलेले हे योगदान लक्षात घेऊन, बंजारा तांडा वासियांनी ‘गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त मतेशी जीकान लायर’ म्हणजे त्यांना विजयी करण्यासाठी ठाम निर्धार व्यक्त केला आहे. गुलाबराव पाटील हे आमचे तांड्यांचे खरे संरक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वात आमचे सर्व प्रश्न सोडवले जातील. असा विश्वास तांडा वासियांनी व्यक्त केला.

तांड्याचा सर्वांगीण विकासासाठी दिला भरघोस निधी..
गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध तांड्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले गेले आहे. मतदारसंघातील वसंतवाडी तांडा, विटनेर तांडा, रामदेव वाडी, सुभाष वाडी, लोणवाडी, मोहाडी तांडा आणि धानवड तांडा येथील पाणीपुरवठा योजना मंजूर करून तांड्यांच्या मुलभूत सोयी-सुविधा उभारण्यात त्यांचे विशेष लक्ष राहिले आहे. गुलाबराव पाटील यांनी तांड्यातील नागरिकांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यांनी अनेक ठिकाणी सेवालाल महाराज भवनांचे बांधकाम मंजूर करून दिले आहे. ग्रामपंचायत कार्यालये बांधण्यात आली आहेत, आणि पोखरी तांड्याला स्वतंत्र ग्राम पंचायतचा दर्जा देऊन विकासकामांना गती दिली आहे. तसेच, तांड्यांपर्यंत रस्ते उभारून बससेवा पुरविण्यात आली आहे, ज्यामुळे तांडा वासियांचे जीवन सुलभ झाले आहे.

बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषेत बंजारा गीताने केले स्वागत !
जळगाव तालुक्यातील बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत बंजारा गीतांच्या माध्यमातून वसंतवाडी येथे गुलाबराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. बंजारा समाजाच्या महिलांनी गीतांद्वारे आपल्या नेत्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त केला. पारंपरिक बंजारा वेशभूषेत साजरा झालेला हा सोहळा उत्साहवर्धक ठरला, ज्यात गुलाबराव पाटील यांच्या कार्यासाठी असलेला त्यांचा उत्साह आणि समर्थन स्पष्टपणे दिसून आले. यावेळी सदर प्रचाररॅलीत तांड्यातील युवक, महिला, आणि ज्येष्ठ नागरिक सर्वजण गुलाबराव पाटील यांच्या प्रचारात एकत्र येऊन त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत.

https://khandeshprabhat.com/wp-content/uploads/2024/11/VID-20241105-WA0034.mp4

यावेळी त्यांच्या सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, दुध संघाचे रमेश पाटील, पी.के. पाटील, सरपंच राजू पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, वसंतवाडी सरपंच विनोद पाटील, लोणवाडी सरपंच बाळू धाडी, अर्जुन पाटील, दशरथ चव्हाण, मांगो चव्हाण, राजाराम राठोड, जयश्री राठोड, मंगू राठोड, उदय चव्हाण, प्रेमराज चव्हाण, भिका राठोड, नवल राठोड, रविंद्र चव्हाण, गोकुळ राठोड, उखर्डू राठोड, सरीचंद राठोड, मोहाडी सरपंच डंपी सोनवणे, पंकज जाधव यांच्यासह परिसरातील महायुतीचे सरपंच , पदाधिकारी व कार्यकर्ते व तांडावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #political
Next Post
प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात

प्रभू श्रीराम यांच्या चरणी लीन होऊन आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराची सुरुवात

ताज्या बातम्या

महापौरांच्या पाहणीत वॉर्ड ११ मधील समस्यांचा पाढा
खान्देश

महापौरांच्या पाहणीत वॉर्ड ११ मधील समस्यांचा पाढा

October 28, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

भडगावच्या तहसीलदार दुचाकी अपघातात जखमी; अवैध वाळू उपसा कारवाई दरम्यान घडली घटना

October 28, 2026
पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी रेल्वे पुलावर आयशरची दुचाकीला धडक; नवविवाहित तरुणाचा मृत्यू

October 28, 2026
मेहरुणमधील जागेची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर नोंदणी
Uncategorized

मेहरुणमधील जागेची बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर नोंदणी

October 28, 2026
कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक
गुन्हे

कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; चालकाला अटक

October 28, 2026
किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी
गुन्हे

किनगाव दगडफेक प्रकरणातील दोषींना तातडीने तडीपार करा; किरीट सोमय्यांची मागणी

October 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add