जळगाव, (प्रतिनिधी) : येथील भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चा तर्फे मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या शहरातील खाजा मियां दर्ग्यावर चादर चढवत आमदार राजू मामा भोळे यांचा विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजय व्हावा यासाठी नवस बोलण्यात आला.
दरम्यान याप्रसंगी मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर प्रार्थना केली. तसेच आ. राजू मामा निवडून आल्यास अकरा किलो ची नियाज वितरण करण्यात येणार असल्याचा नवस बोलण्यात आला. तसेच आमदार भोळे यांच्या हस्ते चादर चढवणार असल्याचे देखील सांगण्यात आले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष अशफाक मुनाफ खाटीक, सरचिटणीस जावेद खाटीक, मोहसीन शाह, उपाध्यक्ष शाहीद शेख, इम्रान खाटीक, वसीम कुरेशी, असलम खान, शरीफ बाबा, युसुफ पठाण यांनी प्रार्थना केली.