• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील समजून काम करा !.. – गुलाबराव पाटील

कार्यकर्त्यांना आवाहन ; २४ ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज !

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 23, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
प्रत्येक महायुतीचा कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील समजून काम करा !.. – गुलाबराव पाटील

कार्यकर्त्यांना आवाहन ; २४ ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज !

जळगाव, दि.२३ (प्रतिनिधी) : महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीच्या बुथचे सूक्ष्म नियोजन करून एकजुटीने आपले गाव व आपला बूथ ही जबाबदारी पार पाडा. महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा. विरोधी उमेदवार कोण यापेक्षा महायुतीचा धनुष्यबाण हेच डोळ्यासमोर ठेवा. धरणगाव येथे २४ ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज दाखला करणार असुन हजारोंच्या संख्येने उपस्थिती द्यावी आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील आहे असे समजून काम करण्याचे आवाहन शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांनी विरोधकांना चिमटे घेत टोलेही लगावले. जळगाव तालुक्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

‘धनुष्यबाण हेच मिशन’ ठेवून काम करा – खा. स्मिताताई वाघ
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदार संघात विकास कामांचा डोंगर उभा केला असून विकास कामांची तटबंदी कोणीही भेदू शकत नाही. प्रत्येकाने “आपल गाव – आपल बुथ ” वर जास्तीत जास्त लीड देण्यासाठी ‘धनुष्यबाण हेच मिशन’ ठेवून काम करण्याचे आवाहन केले. गुजरात हून आलेले भाजपाचे निरीक्षक नितीनजी पटेल यांनी सांगितले की, गुलाबराव पाटील आपल्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभे असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी बूथ जिंका – विजय पक्काचा नारा देत विजयाच्या रणनीती बाबत मार्गदर्शन केले.

तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, रॉ.कॉ.चे जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरीता कोल्हे – माळी, सरचिटणीस योगेश देसले, भाजपा तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, रॉ.कॉ.चे तालुकाध्यक्ष भूषण पवार, सुभाष पाटील, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले की, गुलाबभाऊ यांनी जाती – पातीच्या राजकारणाला थारा न देता केवळ विकास कामांसाठी झटले. गुलाबभाऊ म्हणजे कार्यकर्ते व माणसं जोडणारा तसेच नातं जोपासणारा नेता आहे. गुलाबभाऊच्या विजयासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी खासदार स्मिता वाघ, गुजरातहून आलेले भाजपचे निरीक्षक नितीनजी पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, रॉ.कॉ.चे जिल्हाध्यक्ष तथा जेडीसीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरीता कोल्हे – माळी, रॉ.कॉ. चे योगेश देसले, भाजपा तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, रॉ.कॉ.चे तालुकाध्यक्ष भूषण पवार, भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, सेनेचे संजय पाटील, सुभाष पाटील, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, भाजपाचे गोपाळ भारंबे, मनोहर पाटील, ईश्वर पाटील, माजी सभापती मीना पाटील, सेनेचे उपजिल्हा प्रमुख रवींद्र कापडणे, अनिल भोळे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, भरत बोरसे, शाम कोगटा, मनोरमा पाटील, शितल चिंचोरे, शोभा चौधरी, रमेश पाटील, जितू पाटील डॉ. कमलाकर पाटील, कृ.ऊ. बा. चे माजी सभापती कैलास चौधरी, मुरलीधर पाटील, गोपाल पाटील, वसंत भालेराव यांच्यासह भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Tags: #gulabraopatil#jalgaonrural#vidhansabha
Next Post
विधानसभा निवडणुक | मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार

विधानसभा निवडणुक | मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group